Economy : तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहात का? आजच चाणक्याच्या या गोष्टींचा अंगीकार करा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

पैशासाठी चाणक्य नीती: चाणक्य, भारताचे महान तत्वज्ञानी, अर्थशास्त्राचा आदर्श मानला जातो. चाणक्य नुसार, माणसाने पैशाच्या बाबतीत कधीही बेफिकीर राहू नये, अन्यथा तो गरीब व्हायला वेळ लागत नाही.

Economy : तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहात का? आजच चाणक्याच्या या गोष्टींचा अंगीकार करा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही
आचार्य चाणक्यImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 6:16 PM

मुंबई : जीवनात पैसा हे सर्वस्व नसून आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत करणे महत्त्वाचे आहे. परंतु, आयुष्यात पैसा असणेही गरजेचे आहे. पैश्याशिवाय आज कुठलेही काम करणे अश्यकच आहे. त्यामुळे जिवनात पैसा काटकसरीने खर्च (Spend money sparingly)करणे, कमविलेल्या पैश्याचे योग्य नियोजन करणेही तितकेच महत्वाचे आहे. भारताचे महान तत्त्वज्ञ चाणक्य हे अर्थशास्त्राचे आदर्श मानले जातात. चाणक्य निती नुसार, (According to the Chanakya policy) माणसाने पैशाच्या बाबतीत कधीही बेफिकीर राहू नये, अन्यथा तो गरीब व्हायला वेळ लागत नाही. चाणक्याच्या अशा काही रहस्यमय गोष्टी आहेत, ज्याचे पालन करून तुम्हीही तुमचे घर सुख-समृद्धीने (The house is prosperous) भरू शकता. चाणक्य नितीत सांगीतलेल्या या काही गोष्टींचा विचार केल्यास, त्यांच्या अंगीकार आपल्या रोजच्या व्यवहारात केल्यास, तुम्हाला पैशाची कधीही कमी भासणार नाही.

जीवनात ध्येय निश्चित करा

चाणक्य सांगतात की, जर कोणत्याही व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल आणि पैसा मिळवायचा असेल तर त्यासाठी काहीतरी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित केल्याशिवाय, माणूस आपले गंतव्य साध्य करू शकत नाही आणि पैशापासून दूर राहतो. यासोबतच त्याने आपल्या भविष्यातील योजना विसरू नयेत आणि बाहेरच्या कोणाशीही शेअर करू नये याचीही काळजी घेतली पाहिजे.

उदरनिर्वाहाच्या ठिकाणीच निवासस्थान बांधा

महान चाणक्याच्या मते, व्यक्तीने नेहमी अशा ठिकाणी राहण्यासाठी आपले निवासस्थान बनवले पाहिजे, जिथे त्याच्या उपजीविकेसाठी योग्य संधी असतील. अशा ठिकाणी निवास केल्याने त्याचे घर नेहमी धन-समृद्धींनी भरलेले असते आणि त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्याचबरोबर जेथे तुमचे उत्पन्न नाही त्या भागात घर बांधल्यामुळे तुम्हाला नेहमीच पैशांची कमतरता भासते.

हे सुद्धा वाचा

चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा टिकत नाही

चाणक्य म्हणतो की पैसा मिळवणे पुरेसे नाही, तर ते योग्य मार्गाने मिळवले पाहिजे. चुकीची कामे करून कमावलेल्या पैशाला किंमत नसते आणि ती उलट दिशेने निघून जाते. चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशामुळे तुमचे अनेक शत्रू होतात आणि तुम्ही कधीही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे फक्त पैसे मिळवण्यावर लक्ष केंद्रित करू नका. ते पैसे योग्य प्रकारे कमावले जात आहेत हे देखील पहा.

कठीण वेळेसाठी पैसे वाचवा

पुष्कळ लोक पैशाला त्यांच्या हाताचा मळ समजतात. ते पैशाला पाण्यासारखा खर्च करतात. त्याचा विचार योग्य आहे असे म्हणता येणार नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की, जे वाईट वेळेसाठी पैसे वाचवत नाहीत त्यांना मूर्ख म्हणतात. त्यांना काही काळानंतर समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जो माणूस कठीण प्रसंगी पैसे वाचवतो, अशा वेळीही जीवनाचा गाडा ओढतो तोच खरा व्यवहारी व हुशार व्यक्ती मानला जातो.

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....