Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा

पौष महिन्याला पितृ पक्ष देखील म्हणतात. म्हणूनच यामहिन्यात अमावास्येचे महत्त्व अधिकच वाढते. जर तुमच्या कुटुंबात पितृदोष असेल, ज्यामुळे तुम्हाला सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पौष अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास दोषांपासून मुक्तात मिळू शकेल.

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा
vastu tips
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 12:45 PM

मुंबई : पौष महिन्याला पितृ पक्ष देखील म्हणतात. म्हणूनच यामहिन्यात अमावास्येचे महत्त्व अधिकच वाढते. जर तुमच्या कुटुंबात पितृदोष असेल, ज्यामुळे तुम्हाला सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पौष अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास दोषांपासून मुक्तात मिळू शकेल.

प्रत्येक महिन्याचे 30 दिवस चंद्राच्या टप्प्यांच्या आधारावर असतात. 15-15 दिवसांच्या दोन पंधरवड्यांमध्ये विभागले जातात, एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. कृष्ण पक्षाच्या 15 व्या दिवशी अमावस्या येते, तर शुक्ल पक्षाच्या 15 व्या दिवशी पौर्णिमा येते. प्रत्येक महिन्यातील अमावास्येचा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष हा संपूर्ण महिना पितरांना समर्पित मानला जातो.

पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीचे महत्त्व इतर अमावस्या तिथींपेक्षा अधिक वाढते. पौष महिन्यातील अमावस्या रविवार, 2 जानेवारी 2022 रोजी येईल. यावेळी अमावस्येला सकाळी ०७.१४ ते सायंकाळी ४.२३ पर्यंत सर्वार्थसिद्धी योग आहे. चाला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कराच्या उपायोजना

पितृदोषांपासून मुक्त होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल फुले व काळे तीळ टाकावे. यानंतर आपल्या पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करून सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर पीपळाला जल अर्पण करा. पिंपळाच्या झाडावर पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करून 108 वेळा प्रदक्षिणा घालावी. याशिवाय तिळाचे लाडू, तिळाचे तेल, आवळा, ब्लँकेट, कपडे इत्यादी गरजूंना क्षमतेनुसार दान करा. याशिवाय पितरांच्या शांतीसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करावे.

कुटुंबात प्रेम टिकवण्यासाठी जर काही कारणास्तव तुमच्या कुटुंबात परस्पर प्रेमाची कमतरता असेल, गैरसमज वाढले असतील तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि कुटुंबात सुख-समृद्धीची कामना करा.

करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल, मेहनत करूनही तुमची प्रगती होत नसेल, तर अमावस्येच्या रात्री 5 लाल फुले आणि 5 दिये प्रज्वलित करून वाहत्या नदीत प्रवाहित करा. हा उपाय करताना तुम्हाला कोणीही पाहू नये, हे ध्यानात ठेवा. याशिवाय रात्रीच्या वेळी काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल खाऊ घालावे. यामुळे तुमच्या समस्या काही वेळातच दूर होतील आणि धनलाभ मिळू लागेल.

नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करूनही नोकरी मिळत नसेल तर अमावास्येला अन्नदान करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.