Astro Tips | करिअरमध्ये यश, नोकरीत स्थिरता नाहीये, प्रयत्न करुनही नोकरी मिळत नाहीये, मग हे 6 ज्योतिषीय उपाय करुन पाहा
आनंदी आणि सुख-सुविधा युक्त आयुष्य (Happy Life) कुणाला नको असते. पण, त्यासाठी यशस्वी आणि स्थिर नोकरीची (Successful Career) गरज असते. अनेक वेळा सर्व आवश्यक परिश्रम आणि प्रयत्न करुनही अनेकांना नोकरी मिळत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार (Jyotish Shastra) कुंडलीत कमकुवत ग्रह आणि ग्रहांच्या वाईट स्थानामुळे असे होत असल्याचं सांगितलं जाते.
मुंबई : आनंदी आणि सुख-सुविधा युक्त आयुष्य (Happy Life) कुणाला नको असते. पण, त्यासाठी यशस्वी आणि स्थिर नोकरीची (Successful Career) गरज असते. अनेक वेळा सर्व आवश्यक परिश्रम आणि प्रयत्न करुनही अनेकांना नोकरी मिळत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार (Jyotish Shastra) कुंडलीत कमकुवत ग्रह आणि ग्रहांच्या वाईट स्थानामुळे असे होत असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नोकरीत यश हवं असेल किंवा नोकरी हवी असले तर हे सहा सोपे उपाय करुन पाहा –
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठीचे 6 ज्योतिषीय उपाय
? नोकरीत स्थिर राहण्यासाठी आणि तसेच करिअरच्या चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर तुम्ही दररोज किमान 31 वेळा गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे.
? दररोज सकाळी तांब्याच्या कलशात पाणी आणि गूळ मिसळून ते जल सूर्याला अर्पण करावे. यशस्वी करिअर आणि नोकरीसाठी हे सर्वात सामान्य आणि प्रभावी ज्योतिषीय उपायांपैकी एक मानले जाते.
? सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या दोन्ही तळव्यांकडे बघावे. असे मानले जाते की हा ज्योतिषीय उपाय रोज केल्यास अमाप संपत्ती मिळण्यास मदत होते. हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवी वास करत असल्याची मान्यता आहे.
? नोकरी मिळण्यात सतत विलंब आणि अडथळे येत असतील तर विघ्नहर्ता गणपतीच्या बीज मंत्राचा जप करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. या ज्योतिषीय उपायाने व्यक्तीचे करिअर स्थिर होण्यासही मदत होईल. जर एखाद्याला बीज मंत्र माहित नसेल तर ‘ॐ गण गणपतये नमः’ या मंत्राचाही जप करता येऊ शकेल. तो देखील तितकाच फायदेशीर ठरतो.
? करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणखी एक प्रभावी ज्योतिषीय उपाय म्हणजे एक लिंबू घ्या त्यामध्ये चार लवंगा टोचा. हे लिंबू उजव्या हातात घेऊन भक्तीभावाने “ॐ श्री हनुमते नम:” या मंत्राचा 21 वेळा जप करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लिंबू फेकून देऊ नका, तो खिशात किंवा पर्समध्ये ठेवा.
? उकडलेले तांदूळ कावळ्याला खायला द्या. हा उपाय शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावांना शांत करण्यात मदत करेल. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वांनुसार, शनि व्यक्तीच्या व्यवसायावर आणि करिअरवर राज्य करतो असे म्हटले जाते आणि कावळा शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचे प्रतीक आहे. म्हणून कावळ्याला उकडलेले तांदूळ खाऊ घातल्यास करिअरमध्ये फायदा होतो.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
सूर्यनारायणा सोबतच होते या 6 राशींची सकाळ, तुमची रास यामध्ये आहे का ?