Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार
कोणतेही वास्तू बांधताना वास्तूचे नियम खूप महत्त्वाचे असतात. जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर घेण्याचा विचार करात असाल, तर वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार वास्तु बांधून घराची भरभराट करा.
मुंबई : आपल्या आयुष्यात पंचमहाभूतांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या 5 तत्त्वांचा संबंध आपल्या सुखी आयुष्याशी असतो. तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असास तर पाच घटकांवर आधारित नियमांवर चुकूनही दुर्लक्ष करु नका. वास्तू आपण एकदाच बांधतो त्यामुळे त्यामध्ये वास्तू दोष असल्यास त्यांच्या परिणाम कुटुंबीयांवर होतो. आणि आपल्याला वास्तूत देखील बदल करता येत नाहीत. त्यामुळे घर बांधताना कोणतीही घाई करु नका संपूर्ण विचार करुनच वास्तू बांधा. चला तर मग घरा संबंधीत वास्तू नियम जाणून घेऊयात.
?वास्तशास्त्रानुसार अरुंद जागेत चुकूनही घर घेऊ नका. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांनी अनेक समस्यांना समोरे जावे लागते. अनेक वेळा घरातील सदस्यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वास्तू घेताना हा विचार नक्की करावा.
?घर खरेदी करताना स्वयंपाकघराची विशेष पाहाणी करावी. कोणती गोष्टी कुठे आहे याची खातरजमा करावी. वास्तूनुसार आगीचा कोन म्हणजेच आग्नेय दिशा स्वयंपाकघरासाठी अति शुभ मानली जाते.
?वास्तशास्त्राच्यानुसार, घरातील जिन्याची जागा देखील महत्त्वाची असते. या जागेचा संबंध कुटुंबातील व्यक्तींच्या प्रगतीवर असतो. जिन्याच्या पायऱ्या योग्य दिशेत नसल्यास घरात कलह निर्माण करु शकतात.घरात प्रवेश केल्या नंतर पायऱ्या उजव्या बाजूला असाव्यात. घरातील पायऱ्यांची संख्या नेहमी विषम असावी वास्तूनुसार एकूण सतरा पायऱ्या शुभ मानल्या जाता. त्याप्रमाणे त्यांचा आकार गोलाकार, वक्र नसावा.
?वास्तशास्त्रानुसार घराच्या पूर्वेला मोठे झाड असेल तर ते खूप अशुभ असते. पण जर ते झाड पिंपळाचे असेल तर घर शुभ मानले जाते. या झाडामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
?वास्तशास्त्रानुसार घराच्या समोर किंवा मागे कोणत्याही देवतेचे मंदिर शुभ मानले जात नाही. त्यामुळे घर बांधताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
संबंधित बातम्या :
Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…
PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे
Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…