काळा धागा खरंच आपलं वाईट नजरेपासून संरक्षण करतो? शनि दोषही कमी होतो? वाचा A टू Z

अनेकजण मनगटाला किंवा पायाला काळा धागा बांधतात. काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेला दूर करतो, असं मानलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण काळा धागा बांधतो तेव्हा तो काळा धागा आपल्याकडे येणारी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, असं मानलं जातं.

काळा धागा खरंच आपलं वाईट नजरेपासून संरक्षण करतो? शनि दोषही कमी होतो? वाचा A टू Z
काळा धागा खरंच आपलं वाईट नजरेपासून संरक्षण करतो?
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 10:13 PM

अनेक जण आपल्या मनगटाला किंवा पायाला काळा धागा बांधतात. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडत असेल की, हाताला किंवा पायाला धागा का बांधला असावा? खरंतर तशाप्रकारचा धागा हाताला किंवा पायाला बांधण्याची एक प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा आजही प्रचलित आहे. काही जण फॅशन समजून काळा धागा हाताला किंवा पायाला बांधतात. तर काही जण आपल्याला नजर लागू नये, या विचारातून काळा धागा बांधतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळ्या धागाचे नेमके महत्त्व काय आहे? ते जाणून घेऊयात.

काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेला दूर करतो, असं मानलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण काळा धागा बांधतो तेव्हा तो काळा धागा आपल्याकडे येणारी सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. हा काळा धागा आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतो. काळा रंग हा शनि ग्रहाचा प्रतीक आहे. त्यामुळे काळा धाग्यामुळे शनिच्या प्रकोपपासून संरक्षण होतं, असं देखील मानलं जातं.

अर्थात, विज्ञात या सगळ्या गोष्टी मानत नाही. विज्ञानानुसार, काळ्या धाग्यामुळे कोणताही जादुई परिणाम होत नाही. असं असलं तरीही काही वैज्ञानिक काळ्या रंगाच्या भौतिक गुणांचं समर्थन करतात. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे काळा रंग घातल्याने शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. याशिवाय काही लोक या गोष्टीला एक्यूप्रेशरच्या सिद्धांतासोबत जोडतात. त्यांचं म्हणणं असतं की, शरीराच्या काही अवयवांना काळा धागा बांधल्याने काही खास बिंदूंवर दबाव पडतो, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

या सर्व मान्यता आणि वैज्ञानिक तर्कवितर्कांशिवाय, काळ्या धागाला सांस्कृतिक प्रतीक मानलं जातं. आपल्या परंपरा आणि रिती-रिवाजचा एक भाग मानलं जातं. काळा धागा कुणी कुणाचीही नजर लागू नये यासाठी बांधत असतील किंवा परंपरा म्हणून किंवा इतर कारणांसाठी बांधत असतील, पण काळा धागा हा अनेकांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग बनला आहे. काळा धागा हा विश्वास, परंपरा आणि संस्कृतीला एकत्र जोडण्याचा एक प्रतीक आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.