Astrology : पत्रिकेत दुर्बल असेल शनि तर करावा लागतो अपयशाचा सामना, या उपायांनी दूर होतील समस्या
Shani Upay धार्मिक विद्वानांच्या मते, जेव्हा तुम्ही शनिवारी उपवास करत असाल तेव्हा त्या दिवशी लसूण, कांदा इत्यादी असलेले कोणतेही तामसिक किंवा मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. यासोबतच, इतरांबद्दल काहीही चुकीचा विचार करू नका किंवा बोलू नका. शनिवारी गरजूंना योग्य ते दान करावे. उपवास करणारे लोक दिवसभरात फळे खाऊ शकतात. संध्याकाळी उडीद डाळीची खिचडी खाऊन उपवास सोडावा.
मुंबई : शनिदेवाचे दुसरे नाव धर्मराज आहे. ते कर्मानुसार न्याय करतात. ज्या व्यक्तीवर शनिदेवाचा आशिर्वाद असतो त्याला सर्व कामात यश मिळते. तर ज्या व्यक्तीवर शनिचा प्रकोप असतो त्याला जीवनात अनेक समस्यांना समोर जावे लागते. मात्र, काही खास उपाय आहेत, ज्याचे पालन करून तुम्ही या दोषापासून मुक्त होऊ शकता. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया काय आहेत ते उपाय. ज्योतिषांच्या मते पत्रिकेतील शनि दोष (Shani Dosh) दूर करण्यासाठी व्यक्तीने शनिवारी व्रत ठेवावे. असे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि मार्गात येणारे अडथळे दूर होतात. हे व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करावे. यानंतर लोखंडापासून बनवलेल्या शनिदेवाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. यानंतर शनिदेवाची पूजा करून शनि चालीसा वाचावी.
शनिवारच्या उपवासाचे नियम जाणून घ्या
धार्मिक विद्वानांच्या मते, जेव्हा तुम्ही शनिवारी उपवास करत असाल तेव्हा त्या दिवशी लसूण, कांदा इत्यादी असलेले कोणतेही तामसिक किंवा मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. यासोबतच, इतरांबद्दल काहीही चुकीचा विचार करू नका किंवा बोलू नका. शनिवारी गरजूंना योग्य ते दान करावे. उपवास करणारे लोक दिवसभरात फळे खाऊ शकतात. संध्याकाळी उडीद डाळीची खिचडी खाऊन उपवास सोडावा.
शनिवार व्रताचे महत्त्व
ज्योतिषांच्या मते, ज्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येत आहेत त्यांना शनिवारी व्रत पाळल्याने खूप फायदा होतो. हे व्रत केल्याने घरात सुख-शांती नांदते. नोकरी आणि लग्नात येणारे अडथळे दूर होतील. घरगुती वाद संपतील. कुटुंबात पैशाचा ओघ वाढतो. कुंडलीतील शनि दोष दूर केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते.
या पाच गोष्टी करा
1. शनिवारी उपवास करा.
2. छाया दान करा. (तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहून ते दान करावे)
3. विभूती, भस्म किंवा लाल चंदन लावा.
4. सुंदरकांड किंवा बजरंगबान वाचा.
5. शमीच्या झाडाला जल अर्पण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)