Ayodhya : अयोध्या नगरीला या दोन नावांनीसुद्धा ओळखले जाते, अयोध्येबद्दल न ऐकलेले किस्से

अयोध्येत (Ayodhya City) गेलात तर कान भवन, हनुमानगढ़ी, स्वर्गाचे द्वार आणि त्रेता के ठाकूर अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे एकदा गेल्यावर परत परत जाण्याची इच्छा होते. असो, आपण अयोध्या शहराच्या सौंदर्याबद्दल जाणून घेऊया..

Ayodhya : अयोध्या नगरीला या दोन नावांनीसुद्धा ओळखले जाते, अयोध्येबद्दल न ऐकलेले किस्से
अयोध्या नगरीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 10:38 AM

अयोध्या : अयोध्या शहर केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अखेर तो दिवस येणार आहे, ज्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षा होती. 22 जानेवारीला अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या विशेष प्रसंगी देश-विदेशातील लोकांना आमंत्रीत केले गेले आहे. अयोध्येत (Ayodhya City) गेलात तर कान भवन, हनुमानगढ़ी, स्वर्गाचे द्वार आणि त्रेता के ठाकूर अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे एकदा गेल्यावर परत परत जाण्याची इच्छा होते. असो, आपण अयोध्या शहराच्या सौंदर्याबद्दल जाणून घेऊया, पण तुम्हाला माहिती आहे का की अयोध्येला आणखी एक नाव देखील आहे, जे बहुतेक लोकांना माहित नसेल. अयोध्या हे हिंदूंच्या सात सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. जाणून घेऊया अयोध्येशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी.

अयोध्येचे दुसरे नाव काय आहे?

प्रभू रामाचे शहर अयोध्या हे सरयू नदीच्या पूर्वेला वसलेले आहे. रामायणानुसार अयोध्येची स्थापना मनू यांनी केली होती. कदाचित तुम्हाला माहित नसेल की अयोध्येला ‘देवाची नगरी’ देखील म्हणतात. होय, अथर्ववेदानुसार अयोध्येला देवाची नगरी म्हटले गेले आहे. याशिवाय अयोध्येचे जुने नाव साकेत आहे.

अयोध्येत कुठे फिरायला जावे?

बहू बेगम मकबरा : बहू बेगम मकबरा ताजमहलच्या नावानेही ओळखले जाते. नवाज शुजा-उद-दौला याची पत्नी आणि राणी दुल्हन बेगम उन्मतुजोहरा बानो यांना समर्पित मकबरा बांधण्यात आला होता. फैजाबादमधील हे सर्वात उंच स्मारक आहे. याच्यासमोरच सुंदर बाग बनवण्यात आली आहे. तर, या मकबऱ्यातून शहराचे सुंदर दृश्य दिसते.

हे सुद्धा वाचा

दंत धावन कुंड : हनुमानगढीच्या बाजूलाच दंतधावन कुंड आहे. असं म्हणतात की, भगवान श्रीराम या कुंडातील पाण्यानेच दात साफ करत होते.

शरयू नदी : शरयू नदीच्या दर्शनासाठी आणि यात स्नान करण्यासाठी खूप लांबून लोक येतात. शरयू नदीच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते. त्याचबरोबर भगवान श्री रामाचा आशीर्वाद मिळतो.

गुप्तार घाट : शरयू नदीच्या तटावर असलेल्या या घाटाला घग्गर या नावानेही ओळखले जाते. या जागीच भगवान राम यांनी ध्यान केले होते आणि या नदीत जल समाधी घेतली होती. असं म्हणतात की यानंतरच त्यांना वैकुंठ प्राप्ती झाली होती आणि भगवान विष्णुच्या अवतारात ते स्वर्गात गेले.

खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध

अयोध्या केवळ तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध नाही तर जेवणासाठीही एक उत्तम ठिकाण आहे. होय, जर तुम्ही चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला नसेल तर राजा रामाच्या या शहराला भेट देण्यात काय अर्थ आहे. अयोध्येत एक खास प्रकारचा लाडू बनवला जातो, ज्याची चव पूर्णपणे वेगळी असते. याशिवाय इथे तुम्ही चाट, दही भल्ला, दाल कचोरी आणि रबडी सारखे पदार्थ ट्राय करू शकता. त्यामुळे आता तुम्हाला अयोध्येची इतर नावेही माहीत असतीलच. अयोध्येला जाण्यासाठी तुम्ही बस, विमान किंवा ट्रेनने जाऊ शकता. नुकतेच पंतप्रधान मोदींनी अयोध्या विमानतळाचे उद्घाटनही केले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.