Baba Vanga : संपूर्ण जगच हादरुन गेलंय, बाबा वेंगा यांनी 2025 साठी अशी कोणती भविष्यवाणी केली?
जगभरात कुठे ना कुठे संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक या संघर्षाला बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीशी जोडून पाहत आहेत. भविष्यात मोठ्या संघर्षाची नांदी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बाबा वेंगा यांनी पृथ्वीवरून मानवजात नष्ट होण्याची भीतीही वर्तवली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने चिंता वाढली आहे.
Baba Vanga Predictions : नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे 2025 वर्ष कसं असेल याचं सर्वांना कुतुहूल निर्माण झालं आहे. अनेक ज्योतिषांनी नवीन वर्षाबाबतची भविष्यवाणी केली आहे. यापूर्वीही अनेक ज्योतिषांनी भविष्यवाणी केली होती. त्यांची ही भविष्यवाणी खरीही ठरली होती. पण बुल्गेरियाची नेत्रहीन ज्योतिषी, भविष्यवत्ता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी नेहमीच खरी ठरली आहे. त्यातील काही भविष्यवाणी तर हादरवून सोडणाऱ्या आहेत. 2025साठीही त्यांनी भविष्यवाणी केली आहे. पण या भविष्यवाणीने अवघं जग हादरून गेलंय. बाबा वेंगा यांनी अशी कोणती भविष्यवाणी केलीय, याचीच चर्चा करणार आहोत.
बाबा वेंगा यांना बाल्कन भागातील नास्त्रेदमस म्हटलं जातं. नास्त्रेदमस हे फ्रान्सचे ज्योतिषी होते. त्यांनी अनेक अचूक भविष्यवाणी केल्या होत्या. 1911मध्ये बाबा वेंगा यांचा जन्म झाला. त्या महिला आहेत. 1996 मध्ये 86व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्या अंध होत्या. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी सन 5079ची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी सोव्हियत संघ विघटन, अमेरिकेत दहशतवादी संघटना अलकायदाचा 9/11चा हल्ला आदी भविष्याणी केल्या होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत.
तिसरे महायुद्ध सुरू होणार
बाबा वेंगा यांनी 2025साठी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे जग दहशतीखाली आहे. 2025मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी युरोपात इस्लामिक सत्ता येण्याची आणि पृथ्वीवरून मनुष्यप्राणी नष्ट होण्याचीही भविष्यवाणी केली आहे. वेंगा यांच्या मते, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन एक मजबूत वैश्विक नेते म्हणून उदयाला येणार आहेत. 2025मध्ये यूरोपमध्ये मोठा संघर्ष होणार आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसणार असल्याची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे.
मानवजात नष्ट होणार
यूरोपमध्ये सुरू होणारा संघर्ष हा मानवजातीच्या विनाशाची सुरुवात असेल. हा संघर्ष अधिक पेटणार असल्याची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे. 5079 मध्ये पृथ्वीवरून मानवजाती नष्ट होणार असल्याचं भाकीतही बाबा वेंगा यांनी केलं आहे.
लोकसंख्या कमी होणार
या संघर्षामुळे महाद्विपमधील लोकसंख्या कमी होणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 2025मध्ये एक अशी भयानक घटना होणार आहे, ही घटना मानव जातीच्या अंताचं कारण बनणार आहे, अशी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे. बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भविष्यवाणी केल्या आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय त्यांच्या भविष्यवाणी खऱ्याही ठरत असल्याने जगभर चिंता व्यक्त केली जात आहे.