Bhagwan Buddha : जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा अपमाण करते केव्हा काय करावे? भगवान बुद्धांशी संबंधीत ही गोष्ट अवश्य वाचा

भगवान बुद्धाने आपल्या विचार आणि शिकवणीतून संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. म्हणूनच असे म्हटले जाते की बुद्धाचे विचार तुमचे जीवन बदलू शकतात. आज आपण गौतम बुद्धांशी संबंधित एका कथेबद्दल (Bhawan Buddha Story) जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलेल.

Bhagwan Buddha : जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा अपमाण करते केव्हा काय करावे? भगवान बुद्धांशी संबंधीत ही गोष्ट अवश्य वाचा
भगवान बुद्धImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 2:02 PM

मुंबई :  गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. त्यांनी बोधगया येथे बोधिवृक्षाखाली बसून अनेक वर्षे ध्यान केले आणि त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले. भगवान बुद्धाने आपल्या विचार आणि शिकवणीतून संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. म्हणूनच असे म्हटले जाते की बुद्धाचे विचार तुमचे जीवन बदलू शकतात. आज आपण गौतम बुद्धांशी संबंधित एका कथेबद्दल (Bhawan Buddha Story) जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि आयुष्यात फक्त आनंद राहील. कारण बुद्धाचा असा विश्वास आहे की, तुम्ही सुख किंवा दुःखाला कशाला प्राधान्य देता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे

भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रसंग

एकदा बुद्ध एका गावातून जात होते.  त्या गावातील लोकांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल गैरसमज होते, त्यामुळे ते बुद्धांना आपला शत्रू मानत होते. बुद्ध त्या गावात आल्यावर गावकऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी आणि त्यांचा अपमाण करण्यास सुरूवात केली. पण असे असूनही बुद्ध गावकऱ्यांचे शांतपणे आणि हसतमुखाने ऐकत राहिले. गावकऱ्यांनी पाहिले की बुद्धावर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही.  ते फक्त त्यांचे म्हणणे एकत होते.  गावकरी बोलून कंटाळले तेव्हा शेवटी बुद्ध म्हणाले – ‘तुम्हा सर्वांचे बोलणे संपले असेल तर आता मी निरोप घेतो’.

बुद्धाचे म्हणणे ऐकून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्या गर्दीतील एक व्यक्ती बुद्धांना म्हणाली, ‘आम्ही तुमचे स्वागत केले नाही, तर तुमचा आपमाण आणि तिरस्कार केला आहे. याचा तु्माला काहीच फरक पडत नाही का?” बुद्ध हसत हसत म्हणाले – मला तुमच्या शिवीगाळ किंवा अपमानाने काहीच फरक पडत नाही. तुमच्या शिव्यामुळे मला होणताच लाभ नाही त्यामुळे मी त्या स्विकारल्याच नाही. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मला खूप भेटवस्तू दिल्या. पण मी ते घेण्यास नकार दिला. मी घेतले नाही तर कोणी मला ते कसे देऊ शकेल?

हे सुद्धा वाचा

बुद्धाने विचारले- मला सांग, मी जर त्या भेटवस्तू घेतल्या नही तर भेट देणाऱ्याने त्याचे काय केले असेल? गर्दीतून कोणीतरी म्हणाले – त्या व्यक्तीने आपल्या  भेटवस्तू स्वतःजवळ ठेवले.  बुद्ध म्हणाले म्हणूनच मला तुम्हा सर्वांची दया येते. कारण तुमच्या या शिव्या मी घेऊ शकत नाही आणि मी त्या न स्विकारल्याने या शिव्या तुमच्याकडेच राहतील.

भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित ही कथा आपल्याला शिकवते की आपण अनेकदा इतरांना आपल्या दुःखाचे कारण समजतो. पण खरं तर आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे, आनंद की दु:ख हे आपल्यावर अवलंबून आहे. ही छोटीशी कथा आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.