AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

भालचंद्र संकष्टी चतुर्थी उद्या 31 मार्चला बुधवारी आहे. संकष्टी चतुर्थी दर महिन्यात दोन वेळा येते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात ( Bhalchandra Sankashti Chaturthi 2021).

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Lord ganesha
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 11:00 AM

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 | भालचंद्र संकष्टी चतुर्थी उद्या 31 मार्चला बुधवारी आहे. संकष्टी चतुर्थी दर महिन्यात दोन वेळा येते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात. संकष्टी चतुर्थीला भगवान शंकराचे पुत्र गणेश भगवान यांची पूजा-अर्चना केली जाते. गणेश भक्त यादिवशी गणेशाची कृपा व्हावी यासाठी उपवास ठेवतात. संकष्टी चतुर्थी उपवास सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, हा उपवास केल्याने विघ्नहर्ता गणेश भगवान भाविकांच्या सर्व समस्या आणि संकट दूर करतात. चला जाणून घेऊ या उपवासाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat And Importance)…

भालचंद्र संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त –

भालचंद्र संकष्टी चतुर्थी बुधवार, 31 मार्च, 2021 चन्द्रोदय – रात्री 9 वाजून 39 मिनिटं

चतुर्थी तिथी प्रारम्भ – 31 मार्च , 2021, गुरुवारला दुपारी 2 वाजून 6 मिनिटं

भालचंद्र संकष्टी चतुर्थी उपवास पूजा विधी :

भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून नित्यक्रम आणि स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधाण करा. पूजाघराची साफ सफाई करा आणि व्रतसंकल्प करा. त्यानंतर गणेश भगवानची पूजा-अर्चना करा. त्यांना तीळ, गुळ, लाडू, दुर्वा, चंदन आणि मोदक अर्पित करा. गणेशाची आरती करा. भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा. पूर्ण दिवस उपवास ठेवा. चंद्र निघण्यापूर्वी गणेश देवाची पूजा करा आणि चंद्रमा अर्घ्य द्या.

भालचन्द्र संकष्टी चतुर्थी व्रताचं महत्त्व :

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रताला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं. धर्म शास्त्रानुसार गणेशाला प्रथम देव मानण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा-अर्चना केली जाते आणि त्यांचा उपवास ठेवला जातात. गणेश देवाला विघ्नहर्ताही म्हटलं जातं. हा उपवास करणाऱ्या भाविकांच्या आयुष्यातील सर्व कष्ट आणि समस्या गणेश भगवान दूर करतात.

धार्मिक मान्यतेनुासर भगवान गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. सोबतच सर्व प्रकारच्या संकट आणि दु:खाचं निवारणही होतं. या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि चंद्राच्या दर्शनानंतर उपवास पूर्ण मानला जातो.

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या…

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.