Bhaubij 2022: सूर्य ग्रहणानंतर भाऊबीज, तब्बल 50 वर्षांनंतर जुळून येतोय हा अद्भुत योग

आज भाऊबीजेचा सण काही अर्थांनी विशेष आहे. सूर्य ग्रहानंतर भाऊबीज हा योग तब्बल 50 वर्षांनी जुळून येत आहे.

Bhaubij 2022: सूर्य ग्रहणानंतर भाऊबीज, तब्बल 50 वर्षांनंतर जुळून येतोय हा अद्भुत योग
भाऊबीज Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 5:00 PM

मुंबई, यावर्षी 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा सण साजरा केला जात आहे. ज्योतिषांच्या मते, यंदाचा भाऊबीजेचा (Bhaubij 2022) सण खूप खास असणार आहे. योगायोगाने 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जात आहे. ग्रहणाचा कुठलाही परिणाम या सणावर होणार नसल्याचे जोतिषतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भाऊबीजेला ग्रहांची हालचाल

ज्योतिषांचे म्हणणे आहे की भाऊबीजेच्या सणावर तीन प्रमुख ग्रह आपापल्या राशींमध्ये वास्तव्य करणार आहेत. प्रतिगामी बृहस्पति मीन राशीत आहे, शुक्र तूळ राशीत आहे आणि शनि मकर राशीत आहे. तीन मोठे ग्रह स्वतःच्या राशीत असल्यामुळे सणाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

भाऊबीजेचा मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार, भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी कार्तिक शुक्ल द्वितीया तिथी बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:43 ते दुसऱ्या दिवशी, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत, आपण तारखेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही उत्सव साजरा करू शकता.

हे सुद्धा वाचा

अशी करा भाऊबीजेची तयारी

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. या दरम्यान पूजेमध्ये काही विशेष गोष्टी ठेवणे आवश्यक आहे. भाऊबीजेला भावाला ओवाळताना ताटात  कुंकू , फुले, अक्षत, सुपारी, सोनं, तुपाचा दिवा, नारळ, मिठाई या गोष्टी अवश्य ठेवाव्यात.  या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो.

असा साजरा करा भाऊबीजेचा सण

सकाळी आंघोळ केल्यानंतर बाहिनेने  भगवान विष्णू किंवा गणेशाची पूजा करावी. संध्याकाळी चंद्र निघाल्यावर आधी चंद्राला ओवाळावे त्यानंतर भावाला ओवाळावे. भावाला मिठाई भरवावी व भेटवस्तू द्यावी. भाऊ वयाने मोठा असेल तर त्याच्या पाया पडावे तसेच बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाय पडावे. अशाप्रकारे हा पवित्र सण साजरा करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.