27 तारखेलासुद्धा साजरी करता येणार भाऊबीज, असे आहेत चार शुभ मुहूर्त

यंदा

27 तारखेलासुद्धा साजरी करता येणार भाऊबीज, असे आहेत चार शुभ मुहूर्त
भाऊबीज Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 11:58 PM

मुंबई, हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी करण्याची परंपरा आहे. यावर्षी 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी भाईबीज सण साजरा केला जाणार आहे. वास्तविक, कार्तिक शुक्ल द्वितीय तिथी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:43 ते 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 पर्यंत राहील. त्यामुळे सोयीनुसार भाऊबीजेचा सण साजरा करता येणार आहे.

27 ऑक्टोबरला काय आहे विशेष?

भाऊबीज सण दोन्ही दिवशी साजरा केला जाऊ शकतो, परंतु यंदा  27 ऑक्टोबरची तारीख काही अर्थाने विशेष मानली जात आहे. या दिवशी भाऊबीज साजरी करण्यासाठी एक नव्हे तर चार शुभ योग तयार होत आहेत. या शुभ मुहूर्तांमध्ये भावाला ओवाळणे भाग्याचे ठरेल. 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी बनत असलेल्या शुभ योगांबद्दल आपण जाणून घेऊया.

  1. सर्वार्थ सिद्धी योग – दुसऱ्या दिवशी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:42 ते सकाळी 05:38 पर्यंत
  2. अभिजीत मुहूर्त – सकाळी 11.42 ते दुपारी 12.27 पर्यंत
  3. आयुष्मान योग – 27 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सकाळी 07.27 पर्यंत असेल.
  4. सौभाग्य योग – 27 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 04:33 पर्यंत

भाऊबीजेचे  महत्व

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने ओवाळल्याने भावाचे रक्षण होते अशी मान्यता आहे. असे म्हणतात की, बहीण यमुना हिच्या विनंतीवरून यमराज कार्तिक शुक्ल द्वितीयेला तिच्या घरी गेले. भावाला घरी पाहून यमुना खूप आनंदित झाली. तिने यमराजाचे स्वागत केले आणि त्याला स्वादिष्ट भोजन दिले.

हे सुद्धा वाचा

एका आख्यायिकेनुसार बहीण यमुनेचा आदर आणि कोमल हृदय पाहून यमराज खूप प्रसन्न झाले, पण ते निघून जाताच यमुनेने त्याच्याकडे वरदान मागितले. यमुना म्हणाली की जो कोणी भाऊ आपल्या बहिणीकडून कार्तिक शुक्ल द्वितीयेला ओक्षवन करून घेईल आणि तिच्या घरी भोजन करील त्याला यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळेल. तो अकाली मृत्यूला घाबरणार नाही किंवा जीवनातील गुंतागुंतीच्या समस्या त्याच्या मार्गात येणार नाहीत. तेव्हा यमरानाने यमुनेला हे वरदान दिले. तेव्हापासून भाऊबीज सण  करण्याचा विधी सुरू असल्याचे सांगितले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.