Bhaumvati Amavasya 2021 | कर्जातून मुक्तता हवी असल्यास भौमवती अमावस्येला ‘हे’ उपाय करा
हिंदू धर्मात अमावस्या एक महत्वाचा दिवस मानला जातो (Bhaumvati Amavasya 2021). या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन दान केले जाते. याशिवाय पितरांना तर्पण दिले जाते.
मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या एक महत्वाचा दिवस मानला जातो (Bhaumvati Amavasya 2021). या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन दान केले जाते. याशिवाय पितरांना तर्पण दिले जाते. जर अमावस्या सोमवार, मंगळवार आणि शनिवारी येत असेल तर त्याचे नाव आणि महत्त्व बदलते. वैशाख महिन्यातील अमावस्या मंगळवारी पडत आहे, म्हणून या दिवसाला भौमवती अमावस्या म्हटलं जातं. यावेळी अमावस्या 11 मे 2021 रोजी पडत आहेत (Bhaumvati Amavasya 2021 Do These Upay For Economic Problems).
जर आपण कर्जात बुडलेले असाल आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी कोणताही मार्ग समजत नसेल तर भौमवती अमावस्येच्या दिवशी विशेष उपाय करा. हे उपाय केल्यास तुम्ही कर्जापासून मुक्त व्हाल. त्याचबरोबर आर्थिक संकटही दूर होईल. या अमावस्येला भरणी नक्षत्र योग बनतो आहे, जो खूप शुभ मानला जातो.
भौमवती अमावस्येच्या दिवशी हे उपाय करा
? भोमावती अमावस्येच्या दिवशी सूर्य देवाची अर्चना करा आणि तांब्याच्या तांब्यात पाणी भरुन गूळ आणि लाल चंदनाचं पावडर मिसळा. भगवान सूर्याला अर्घ्य द्या आणि त्यांची तेरा नावांचा उच्चार करा.
? या दिवशी मंगळ स्त्रोताचं पठण करा. भौमवती अमावस्येच्या दिवशी तांब्याचं त्रिकोण मंगलयंत्र घरात स्थापित करा आणि मंगळ स्तोत्राचं रोज पठण करा. यंत्रावर लाल रंगाचं चंदन लावा. असे केल्याने आपल्याला धन लाभ होईल.
? भौमवती अमावस्येच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी श्री गणेश ऋण मोचक मंगल स्तोत्राचे 51 पाठ करा आणि भगवान गणेशांना त्यांचे आवडते नैवद्य द्या.
? घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी, भौमवती अमावस्येच्या दिवशी श्री यंत्राची विधीवत पूजा करा आणि श्रीसूत्कचे पठण करा. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
भौमवती अमावस्येचा मुहूर्त
भौमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त 10 मे 2021 रोजी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी सुरि होईल, जो 12 मे रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल.
Vaishakh Amavasya 2021 | पितरांच्या मोक्षसाठी, कालसर्प दोष मुक्तीसाठी वैशाख अमावस्येला ‘हे’ उपाय कराhttps://t.co/ZXlS568zsT#VaishakhAmavasya #VaishakhMonth
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
Bhaumvati Amavasya 2021 Do These Upay For Economic Problems
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shani Trayodashi | दारिद्र्यातून मुक्ती, संतती सुख हवे असेल तर शनि त्रयोदशीला ‘हे’ उपाय करा
Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा