Blood Moon: या दोन दिवशी दिसणार ब्लड मून, दुर्मिळ चंद्र ग्रहण
मे 15 आणि 16 तारखेला चंद्र ग्रहण आहे. पौर्णिमा 3 तास, 27 मिनिटं आणि 58 सेकेंदांची असेल. हे फार दुर्मिळ असे चंद्र ग्रहण आहे.
मे 15 आणि 16 तारखेला चंद्र ग्रहण (Lunar eclipse) आहे. पौर्णिमा 3 तास, 27 मिनिटं आणि 58 सेकेंदांची असेल. हे फार दुर्मिळ असे चंद्र ग्रहण आहे. कारण यावेळी चंद्र रक्तरंजित लाल (Blood Moon) रंगाचा दिसणार आहे. हे दोन्ही योगा योग कित्येक वर्षातून एकदाच येतात. वैज्ञानिक याला सुपर लूनर इव्हेंट म्हणत आहेत. कारण संपूर्ण ग्रहण असेल आणि चंद्राचा रंगही लाल रंगाचा असेल. पण, यासर्व घटना एकसाथ का होत आहेत? याचा पृथ्वीवर प्रभाव होणार की नाही? जाणून घेऊया…
चंद्र ग्रहण काय आहे आणि हे कसं असतं? (What is Lunar Eclipse?)
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते.चंद्र त्याच्या कक्षेत पाच अंशांनी झुकलेला आहे. त्यामुळे फुल मून म्हणजेच संपूर्ण चंद्र धर्तीच्या सावलीच्या थोडा वर असतो किंवा थोडा खाली. पण, चंद्र आपल्या कक्षेत दोन वेळा अशा स्थितीत येतो जेव्हा तो पृथ्वी आणि सूर्यासमोर एकाच हॉरिजोंटल पातळीवर असतो. न वर ना खाली. म्हणजे एका ओळीत. त्यामुळे अशा स्थितीत पूर्ण चंद्रग्रहण लागते.
चंद्र रक्तरंजित लाल रंगाचा का दिसणार ?
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या मागे पूर्णपणे झाकला जाईल तेव्हा त्यावर सूर्याचा प्रकाश पडणार नाही. तो अंधारा जाईल. पण, चंद्र कधी पूर्णपणे काळा होत नाही. तो लाल रंगाचा दिसू लागतो.
म्हणून अनेकवेळा पूर्ण चंद्र ग्रहणाला ब्लड मून म्हणजेच रक्तरंजित चंद्र ग्रहण देखील म्हणतात. आता सांगतो लाल रंगच का? चंद्राच्या प्रकाशात सर्वच रंग व्हिजिबल रंग असतात.
पृथ्वीच्या वायूमंडलात असलेला वायू त्याला निळ्या रंगाचा भासतो. लाल रंगाची वेवलेंथ याला पार करते. Rayleigh Scatterinhg म्हणतात. म्हणून तुम्हाला आकश नीळे आणि सूर्योदय आणि सूर्योस्त लाल रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या चंद्रग्रहणाच्या वेळी, एक लाल तरंगलांबी पृथ्वीच्या वातावरणातून जाते. वातावरणामुळे ते चंद्राकडे वळते. निळा रंग येथे फिल्टर केला जातो.यामुळे चंद्राचा रंग लाल दिसतो.
तुम्हाला हा चंद्र कुठे आणि कसा दिसेल?
तुम्हाला चंद्र ग्रहण पाहयचे असेल तर तुम्हाला पृथ्वीच्या त्या भागात राहावे लागेल जिथे रात्र असेल. तसेच, यावेळी संपूर्ण चंद्रग्रहण प्रशांत महासागराच्या मध्य रेषेवर, अमेरिकेचा दक्षिण भाग, आफ्रिका आणि कॅनडा, ग्रीनलँडवर दिसणार आहे.
भारतात दिसणार की नाही?
15-16 च्या संध्याकाळनंतर, जसजसा अंधार वाढत जाईल तसतसा हा सुपरमून त्याच्या ग्रहणाच्या दिशेने जाईल. संपूर्ण चंद्रग्रहण असल्याने ते पूर्णपणे लाल रंगाचे दिसेल. हे दृश्य यावेळीच पाहण्यासारखे असेल. ते भारतात दिसणार नाही. हे मध्य अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि युरोपियन देशांमध्ये दिसेल.
See the fiery Blood Moon rise in a total lunar eclipse in May’s must-see skywatching event https://t.co/kbtM9KSiqM pic.twitter.com/nsk5VVr3p7
— SPACE.com (@SPACEdotcom) May 8, 2022
काय असतो सूपरमून ?
सगळ्यात आधी सूपर मून काय असते हे समजून घेऊया. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा त्याचा आकार 12 टक्के मोठा दिसतो. साधारणपणे, पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 406,300 किलोमीटर असते. पण हे अंतर कमी होवून 356,700 किलोमीटर होते. तेव्हा चंद्र मोठा दिसतो. म्हणूनच याला सुपरमून असं म्हणतात. यावेळी चंद्र आपल्या कक्षेत फिरत असताना पृथ्वीच्या जवळ येतो. कारण चंद्र पृथ्वीभोवती वर्तुळाकार परिक्रमा करत नाही. तो लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. अशा स्थितीत तो पृथ्वीच्या कक्षेत येतो. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने तो अधिक दिपमान दिसतो.