Brahma Muhurta : हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताला आहे विशेष महत्त्व, किती ते किती वाजेपर्यंत असतो ब्रह्म मुहूर्त?
ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो.
मुंबई : हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजे ब्रह्म मुहूर्त (Brahama Muhurat Timing) हा देवाचा काळ आहे. या मुहूर्तामध्ये शरीरात नवीन ऊर्जा आणि उत्साह येतो. तसेच यावेळी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो. असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तावर सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी या काळात काही विशेष काम करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर अशी काही कामे देखील शास्त्रात सांगण्यात आली आहेत जी ब्रह्म मुहूर्तामध्ये करू नयेत. चला तर मग जाणून घेऊया ब्रह्म मुहूर्ताचा काळ केव्हापर्यंत टिकतो आणि या काळात कोणती कामे करू नयेत.
किती असतो ब्रह्म मुहूर्ताचा वेळ?
ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्री प्रहार नंतरचा आणि सूर्योदयापूर्वीचा काळ. पहाटे 4 ते 5.30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात.
हे काम ब्रह्म मुहूर्तात करू नका
सकाळी उठल्याबरोबर किंवा ब्रह्म मुहूर्तात अन्न ग्रहण करू नये. आरोग्याच्या दृष्टीने असे करणे शुभ मानले जात नाही. यावेळी जेवल्याने अनेक आजार होऊ शकतात.
ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो. म्हणूनच ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी मनात कधीही नकारात्मक भावना आणू नये. अन्यथा, तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
ब्रह्म मुहूर्तामध्ये कोणते काम करावे?
ब्रह्म मुहूर्तामध्ये शुभ कार्य केल्याने ते लवकर पूर्ण होतात. अशा वेळी उठून स्नान वगैरे करून पूजा करावी. या काळात उपासना केल्याने देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)