AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंगेत डुबकी मारल्याने पापं धुता येतात का? महाकुंभ स्नानावर काय म्हणाल्या जया किशोरी

लखनऊमध्ये एका साहित्य, अध्यात्म आणि कला महोत्सवाला प्रसिद्ध कथावाचक जया किशोर यांनी हजेरी लावली, त्यांनी यावेळी 'भक्ती, जीवन आणि माया' या विषयावर आपले विचार मांडले.

गंगेत डुबकी मारल्याने पापं धुता येतात का? महाकुंभ स्नानावर काय म्हणाल्या जया किशोरी
Follow us
| Updated on: Feb 16, 2025 | 3:46 PM

महाकुंभात गंगेत डुबकी लावण्यासाठी यंदा अलोट गर्दी उसळली आहे. अनेक भाविकांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा जमुना सरस्वती नद्यांच्या संगम घाटावर डुबकी मारुन झाली आहे. या महाकुंभात यंदा मुकेश अंबानी फॅमिलीपासून ते मिसेस स्टीव्ह जॉब्सपर्यंत अनेकांनी डुबकी लावली आहे. उत्तर प्रदेशात लखनऊत साहित्य, कला आणि मनोरंजन यांच्या साहित्य महोत्सव २०२५ कार्यक्रमात प्रसिद्ध कथावाचनकार जया किशोरी यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना महाकुंभातील स्नानासंदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता, त्यांनी त्यावर मोठे अध्यात्मिक उत्तर दिले आहे.

सेशनमध्यये जया किशोरी यांनी महाकुंभ येथील स्नानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. जया किशोरी म्हणाल्या की महाकुंभात कोण डुबकी लावत आहे. कोण लावत नाही. कोण चांगला आहे, ते मला काही माहिती नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की डुबकी लावल्याने पाप धुता येत नाही. डुबकी लावल्याने तिच पाप धुता येतात की अनावधानाने घडली आहेत. विचारपूर्वक एखादे पाप केले असेल तर ते धुता येत नाही.

कर्माची फळे मिळतात..

जर तुम्ही एखाद्याला जाणून बुजून त्रात देत असाल तर त्याचं पाप गंगा मैया धूत नाही. त्याला त्याच्या कर्माची फळे मिळतातच, कोण डुबकी लावत आहे? त्याने जीवनात काय केले आहे? ही बाब अलहीदा अशाही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

लोकांनीही थोडी मर्यादा आणि नियम पाळले पाहीजेत

तरुणांचा महाकुंभमध्ये ओढा वाढल्या संदर्भात त्यांना प्रश्न केला असता जया किशोरी म्हणाल्या की, आपला देश बदलत आहे आणि भक्तीच्या मार्गावर चालला आहे. लोक मोकळ्या मानसिकतेसोबत भक्ती आणि अध्यात्मच्या दिशेने ओढले जात आहेत ही गोष्ट चांगली आहे असेही त्या म्हणाल्या.  महाकुंभात झालेल्या दुर्घटनांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की जे घडले त्याबद्दल माफी मागू शकता. एवढ्या मोठ्या संख्येने तेथे पोहचणे योग्य गोष्ट नाही. पण लोकांनीही थोडी मर्यादा आणि नियम पाळले पाहीजेत.

‘नास्तिक व्यक्ती अध्यात्मिक असू शकतो का ?’

कोणता नास्तिक व्यक्ती अध्यात्मिक असू शकतो का ? असा सवाल केला असता जया किशोरी म्हणाल्या की जर तुम्ही अध्यात्मिक आहात तर शक्तीला मानाला लागेल. येथे शक्ती म्हणजे कर्म होय..जर तुम्ही स्वत:लाच सर्वोपरी मानणार असाल तर तुम्ही अध्यात्मिक नाही असे त्यांनी सांगितले.

अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.