ख्रिसमस का साजरा केला जातो? सिक्रेट सांता काय आहे?
नवीन वर्षाच्या आधी साजरा होणारा ख्रिसमस हा जगभरातील लोकांसाठी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. ख्रिश्चन धर्माचा हा प्रमुख सण असला तरी, सर्व धर्मीयांकडून तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सांताक्लॉस, ख्रिसमस ट्री, आणि भेटवस्तू या ख्रिसमसच्या अविभाज्य घटक आहेत. या लेखात ख्रिसमसच्या इतिहासाची, परंपरा आणि सांताक्लॉसच्या पौराणिक कथेची चर्चा करण्यात आली आहे.
नवीन वर्ष संपता संपता ख्रिसमस साजरा केला जातो. जगभरात सर्व धर्मीयांकडून ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरीच नाही तर ऑफिसमध्येही अनेकजण ख्रिसमस साजरा करतात. बच्चे कंपनीला या ख्रिसमसची खूप अतुरता असते. त्याचं कारण म्हणजे सांताक्लॉस. सांताक्लॉसकडून गिफ्ट मिळतं म्हणून बच्चे कंपनीला त्याची आतुरता वाटते. खरं तर नाताळ म्हणजे ख्रिसमस हा धार्मिक सण आहे. ख्रिश्चन धर्मियांचा हा सण आहे. पण सर्वच धर्मीय हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात.
25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. त्यामुळे हा उत्सव साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माच्या मते, येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता, पण येशूचा खरा जन्मदिवस कोणत्या दिवशी आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित नाही. येशूच्या जन्माच्या तारखेशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक घटनांवरून या तारखेला त्याच्या जन्माचा दिवस म्हणून मान्यता दिली गेली आहे. ख्रिसमस एक पवित्र आणि धार्मिक सण असला तरी, याचे पालन अनेक धर्म आणि संस्कृतींमध्ये केले जाते. या दिवशी भेटवस्तू दिल्या जातात. ख्रिसमस कार्ड दिले जाते. जेवण, ख्रिसमस ट्री, रोशनाई आणि मेरी आणि जोसेफ यांच्या जन्मदृश्याची सजावट करून हा उत्सव साजरा केला जातो.
सिक्रेट सांता
‘सिक्रेट सांता’ हा ख्रिसमसमधील लोकप्रिय खेळ आहे. या खेळात एकमेकांना भेटवस्तू गिफ्ट म्हणून दिली जाते. पण ती संबंधित व्यक्तीला कळू न देता गिफ्ट दिली जाते. या खेळात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस गुपचुप भेट देतो. परंतु हे गिफ्ट कुणी दिलंय हे त्या व्यक्तीला कधीच समजत नाही. हा खेळ सहसा ख्रिसमस पार्टीमध्ये खेळला जातो आणि त्यात मजा आणि उत्साह असतो. हल्ली अनेक कार्पोरेट ऑफिसमध्येही सिक्रेट सांताचं आयोजन केलं जातं.
सांताक्लॉस
सांता किंवा ‘सांटाक्लॉस’ हे ख्रिसमसमधील एक काल्पनिक पात्र आहे. मुलांमध्ये रमणारं, त्यांना गिफ्ट देणारं आणि त्यांच्याशी मौजमजा करणारं हे पात्र आहे. लाल भडक जाड पोशाख घालणारा, पांढरी दाढी असलेला आणि काळा बूट घालणारा वृद्ध व्यक्ती म्हणजे सांताक्लॉस. कथेनुसार सांता रात्री घरी येऊन मुलांच्या सॉक्समध्ये भेटवस्तू ठेवतो. ही परंपरा मुख्यत: युरोपियन देशांमध्ये लोकप्रिय आहे.
पौराणिक कथा
नाताळशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. काही इतिहासकारांच्या मते, इटलीतील मायाबा या नगरातील बिशप, निकोलस नावाच्या वृद्ध व्यक्तीने चौथ्या शतकात एका ख्रिसमसच्या रात्री मुलांना भेटवस्तू दिल्या होत्या. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात तो मुलांना गोडधोड वस्तू देऊन आशीर्वाद देत असे. नंतर या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याला संत म्हणून पाद्रीकडून मान्यता दिली गेली. त्याला ‘सेंट निकोलस’ किंवा ‘सांटा क्लॉस’ म्हणू लागले.
ख्रिसमस ट्रीची सुरूवात कशी?
ख्रिसमसच्या ट्रीची परंपरा हजारो वर्षांपूर्वी उत्तर युरोपमध्ये सुरू झाली होती. त्या काळात ‘फिर’ नावाच्या एका झाडाने घर सजवण्याची परंपरा होती. हळूहळू ख्रिसमस ट्री साजरा करण्याची परंपरा इतर देशांमध्येही पसरली. आज, प्रत्येक घरात एक सुंदर ख्रिसमस ट्री सजवला जातो, ज्यावर लाईट्स, चॉकलेट्स, आणि विविध उपहार ठेवले जातात. या सर्व परंपरांनी ख्रिसमसला महत्त्व आलं आहे. धर्माच्या पलिकडे जाऊन लोक हा उत्सव साजरा करतात.