Chaitra Navratri 2021 | कधीपासून सुरु होतेय ‘चैत्र नवरात्री’, जाणून घ्या कुठल्या दिवशी दुर्गा देवीच्या कुठल्या स्वरुपाची पूजा होणार….
हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2021) नऊ रुपांची पूजा केली जाते.
मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीच्या (Chaitra Navratri 2021) नऊ रुपांची पूजा केली जाते. या दरम्यान भक्त विधीवत देवी दुर्गाची पूजा करतात. तर काही लोक या नऊ दिवसांदरम्यान उपवास ठेवतात. वर्षभरात चार वेळा नवरात्री येते. यामध्ये दोन या गुप्त नवरात्री असतात ज्या आषाढ आणि माघ महिन्यात येतात. तर इतर दोन नवरात्री या चैत्र आणि शारदीय महिन्यात येतात (Chaitra Navratri 2021 Know The Tithi Of Navratri And Durga Mata Vahan).
हिंदू पंचांगांनुसार, चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव साजरा केला जातो. चला जाणून घेऊ कुठल्या दिवशी सुरु होईल नवरात्री –
या दिवशी नवरात्रीला होणार सुरुवात –
यावेळी चैत्र नवरात्रीची सुरुवात 13 एप्रिलला होणार आहे. तर 22 एप्रिलला नवरात्री समाप्त होईल. 13 एप्रिलला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवशी देवी दुर्गेच्या नऊ स्वरुपांची विधीवत पूजा केली जाते. 13 एप्रिलला कलश स्थापना होईल. नवरात्रीला कलश स्थापना करण्याला विशेष महत्त्व असते. अशी मान्यता आहे की कलश स्थापन केल्याने घरात सुख-समृद्धी असते.
देवी दुर्गेचं वाहन
नवरात्रीमध्ये देवी दुर्गा ज्या वाहनावर सवार होऊन येते त्याचंही मोठं विशेष महत्त्व असते. यावेळी देवी दुर्गा घोड्यावर विराजमान होऊन येईल. यापूर्वी शारदीय नवरात्रीत देवी घोड्यावर विराजमान होऊन येणार आहेत.
नवरात्रीचे नऊ दिवस
13 एप्रिल – देवी शैलपुत्री
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात कलश स्थापना केली जाते. नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित असतो. या दिवशी विधीवत उपासना केल्यास देवी शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळतो.
14 एप्रिल 2021 – देवी ब्रह्मचारिणी
नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित असतो. या दिवशी उपासना केल्यास व्यक्तीचा संयम वाढतो आणि राग नियंत्रित होतो.
15 एप्रिल- देवी चंद्रघंटा
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्यास व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा वाढतो.
16 एप्रिल- देवी कुष्मांडा
नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडा यांनी समर्पित असतो. या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केल्याने रोग दूर होतात.
17 एप्रिल- देवी स्कंदमाता
नवरात्रीचा पांचवा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असतो. या दिवशी देवी दुर्गाची पूजा केल्याने यश आणि धन प्राप्ती होते.
18 एप्रिल- देवी कात्यायनी
नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित असतो. या दिवशी देवी दुर्गेचं सहावं स्वरुप कात्यायनीचं पूजन केल्याने शत्रू अशक्त होतो (Chaitra Navratri 2021 Know The Tithi Of Navratri And Durga Mata Vahan ).
19 एप्रिल- देली काळरात्री
नवरात्रीचा सातवा दिवस देवी काळरात्रीला समर्पित असतो. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने पापातून मुक्ती मिळते.
20 एप्रिल- देवी महागौरी
नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. अष्टमीचा दिवस अत्यंत शुभ असतो.
21 एप्रिल- देवी सिद्धीदात्री
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा-अर्चना केली जाते. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला व्यक्तीला नवीन निधी प्राप्त होतो.
Sheetala Ashtami 2021 | शीतला अष्टमी व्रताने आरोग्य, आर्थिक समस्या सुटतील, देवीला शिळ्या पदार्थाचा नैवेद्य का?https://t.co/KPHbWZpnVo#SheetalaAshtami2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2021
Chaitra Navratri 2021 Know The Tithi Of Navratri And Durga Mata Vahan
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन ग्रह राशी बदलणार, ‘या’ राशींना होणार मोठा फायदा…
एप्रिल महिन्यात नवरात्र, राम नवमी आणि शीतला अष्टमीसह अनेक उत्सव, जाणून घ्या कधी कुठला सण…