Chaitra Navratri : 51 शक्तीपीठांपैकी एक हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये, ‘नानी का हज’ म्हणून प्रसिद्ध!

चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri ) पवित्र सण 2 एप्रिलपासून सुरू झाला आहे. नवरात्रीनिमित्त मदिराम मातेच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. या शक्तीपीठाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुराणानुसार जगात 51 शक्तीपीठे आहेत. त्यापैकी 42 भारतात (India), 1 पाकिस्तानात, 4 बांगलादेशात, 2 नेपाळमध्ये, 1 तिबेटमध्ये आणि 1 श्रीलंकेत आहेत.

Chaitra Navratri : 51 शक्तीपीठांपैकी एक हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये, 'नानी का हज' म्हणून प्रसिद्ध!
चैत्र नवरात्रीनिमित्त जाणून घ्या शक्तीपिठांबद्दल.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 10:35 AM

मुंबई : चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri ) पवित्र सण 2 एप्रिलपासून सुरू झाला आहे. नवरात्रीनिमित्त मदिराम मातेच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. या शक्तीपीठाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुराणानुसार जगात 51 शक्तीपीठे आहेत. त्यापैकी 42 भारतात (India), 1 पाकिस्तानात, 4 बांगलादेशात, 2 नेपाळमध्ये, 1 तिबेटमध्ये आणि 1 श्रीलंकेत आहेत. पण आज आपण पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये असलेल्या हिंगलाज शक्तीपीठाबद्दल बोलणार आहोत. हिंगलाज शक्तीपीठाचा प्रवास अमरनाथपेक्षाही (Amarnath) कठीण असल्याचे सांगितले जाते. इथे हिंदू आणि मुस्लिम असा भेद नाही. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घ्या या मंदिराबद्दल.

हिंदूंसाठी देवी आणि मुस्लिमांसाठी नानी का हज

हिंगलाज मंदिराबद्दल असे म्हटले जाते की ते 2000 वर्षांहून अधिक जुने आहे. इथे हिंदू आणि मुस्लीम असा भेद अजिबात होत नाही. हिंदू आणि मुस्लिम एकत्र मातेची पूजा करतात. हिंदू या मंदिरात देवीच्या रूपात पूजा करतात, तर मुस्लिम नानी का हज किंवा ‘पीरगाह’ म्हणतात. अफगाणिस्तान, इजिप्त आणि इराण व्यतिरिक्त बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमधूनही लोक येथे दर्शनासाठी येतात.

अमरनाथपेक्षाही कठीण मार्ग

हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज येथे हिंगोल नदीच्या काठावर आहे. या मंदिराचा प्रवास अमरनाथ पेक्षा जास्त कठीण असल्याचे म्हटले जाते. कारण पूर्वी जेव्हा येथे जाण्यासाठी योग्य साधन उपलब्ध नव्हते तेव्हा या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 45 दिवस लागायचे. आजही या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे हिंगोल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर, मकरन वाळवंटातील खेरथर टेकड्यांच्या शेवटी बांधले गेले आहे.

मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी दोन संकल्प घ्यावे लागतात

या मंदिरामध्ये देवीची मूर्ती नाही. परंतु एका छोट्याशा नैसर्गिक गुहेत एक छोटा खडक आहे, ज्याची हिंगलाज माता म्हणून पूजा केली जाते. मंदिरात येण्यापूर्वी दोन संकल्प घ्यावे लागतात. हे दोन्ही संकल्प भक्तांच्या परीक्षेसाठी आहेत. जर ते पूर्ण झाले नाहीत तर तुमचा प्रवास आणि भक्ती पूर्ण मानली जात नाही. भारतामधूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी जातात.

संबंधित बातम्या : 

Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही या गोष्टी करू नका…

03 April 2022 Panchang | 03 एप्रिल 2022, रविवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.