राशीनुसार दुर्गा देवीला या रंगाची फुले अर्पण करा, सर्व इच्छा पूर्ण होतील!
2 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2022) सुरुवात झाली आहे. या दरम्यान देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीसाठी भक्त उपवास ठेवतात आणि भक्तिभावाने पूजा करतात. माँ दुर्गेला फळे आणि फुले अर्पण केली जातात. नवरात्रीची (Navratri) पूजा फुलांशिवाय अपूर्ण मानली जाते.
मुंबई : 2 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2022) सुरुवात झाली आहे. या दरम्यान देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीसाठी भक्त उपवास ठेवतात आणि भक्तिभावाने पूजा करतात. माँ दुर्गेला फळे आणि फुले अर्पण केली जातात. नवरात्रीची (Navratri) पूजा फुलांशिवाय अपूर्ण मानली जाते. यादरम्यान राशीनुसार देवीला फुले अर्पण करून आशीर्वाद मिळतो. असे केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. राशीनुसार (Zodiac) दुर्गा देवीला कोणत्या रंगाची फुले अर्पण करावीत, चला जाणून घेऊयात सविस्तपणे.
मेष
मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांनी माता दुर्गाला लाल रंगाचे फूल अर्पण करावे. यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
वृषभ
वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. पांढरा रंग शुक्राला अतिशय प्रिय आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पांढऱ्या रंगाचे फुल देवीला वाहून पूजा करू शकता.
मिथुन
या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुधाचा संबंध पिवळा मानला जातो. मिथुन राशीच्या लोकांनी देवीला पिवळे फुल अर्पण करावे.
कर्क
कर्क राशींच्या या राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला कमळ आणि चमेलीचे फूल अर्पण करावे.
सिंह
या राशीचा स्वामी सूर्यदेव मानला जातो. या राशींच्या लोकांनी देवीला लाल किंवा केशरी फुले अर्पण करणे फायदेशीर ठरेल.
कन्या
या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांनी देवीला हिरव्या रंगाची फुले अर्पण करावीत.
तुला
या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी देवीला पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे.
वृश्चिक
या राशीच्या लोकांनी माँ दुर्गाला लाल रंगाची फुले अर्पण करावीत.
धनु
धनु हा या राशीचा स्वामी आहे. पिवळा रंग गुरूला अतिशय प्रिय आहे. या राशीच्या लोकांना पिवळे फुल अर्पण करावे.
मकर
या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाला निळा रंग खूप आवडतो. निळे रंगांची फुल देवीला मकर राशींच्या लोकांना अर्पण करावीत.
संबंधित बातम्या :
Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही या गोष्टी करू नका…