AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? जाणून घ्या….

Chaitra Navratri Puja Vidhi: नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत जगदंबेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यासोबतच उपवासही पाळला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालावेत. अशा परिस्थितीत, त्या ९ दिवसांसाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत ते जाणून घेऊया.

Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? जाणून घ्या....
Chaitra NavratriImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 1:08 PM

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. धर्म ग्रथांनुसार, नवरात्रीचे दिवस खूप खास मानले जातात. रात्रीचा सण सकारात्मक उर्जेने भरलेला असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत, माता जंगदंबेच्या नऊ रूपांची योग्य विधींनी पूजा केली जाते. जो कोणी नवरात्रीत खऱ्या भक्तीने देवीची पूजा करतो, त्याचे सर्व दुःख दूर होतात. देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासोबतच, भाविक नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे देखील परिधान करतात. असे मानले जाते की असे केल्याने दुर्गा देवीच्या सर्व 9 रूपांचे आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होते. या महिन्यात चैत्र नवरात्र सुरू होईल. अशा परिस्थितीत, नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणते कपडे घालावेत ते जाणून घेऊया.

हिंदू वैदिक कॅलेंडरनुसार, या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होत आहे आणि 30 मार्च रोजी दुपारी 12 49 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, यावर्षी चैत्र नवरात्र 30 मार्चपासून सुरू होईल. चैत्र नवरात्र 7 एप्रिल रोजी संपेल. हिंदू धर्मानुसार, आपल्या ग्रंथांमध्ये काही विषेष नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते.

पहिला दिवस- चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित असतो. आई शैलपुत्री हिमालयराजांची कन्या मानली जाते. आईला पिवळा आणि पांढरा रंग खूप आवडतो. म्हणून, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळे आणि पांढरे रंगाचे कपडे घालावेत.

दुसरा दिवस- नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित असतो. दुसऱ्या दिवशी, आई ब्रह्मचारिणीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये तुमची प्रगती होते.

तिसरा दिवस- नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटा यांना समर्पित आहे. आईचा आवडता रंग लाल आहे. म्हणून, तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत. लाल कपडे तुमच्या मनातील सर्व समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

चौथा दिवस- नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडा यांना समर्पित आहे. आईचे आवडते रंग निळे आणि जांभळे आहेत. म्हणून, चौथ्या दिवशी निळे आणि जांभळे रंगाचे कपडे घालावेत. असे केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

पाचवा दिवस- नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित आहे. या दिवशी पिवळे आणि पांढरे रंगाचे कपडे घालावेत. शांततेचे प्रतिक मानले जाते असे केल्यास तुमच्या मनामध्ये चांगले आणि सकारात्मक विचार येतात.

सहावा दिवस- नवरात्रीचा सहावा दिवस माता कात्यायनीला समर्पित आहे. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ आहे. असे केल्यामुळे तुम्हाला देवी माताचे आशिर्वाद मिळतात आणि सर्व समस्या दूर होतात.

सातवा दिवस- नवरात्रीचा सातवा दिवस माता कालरात्रीला समर्पित आहे. आईचे हे रूप उग्र आणि तेजस्वी आहे. या दिवशी तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी असे केल्यास तुमच्या वरील सर्व नकारात्मक उर्जा निघून जाते.

आठवा दिवस- नवरात्रीचा आठवा दिवस माता महागौरीला समर्पित आहे. या दिवशी पांढरा आणि जांभळा रंग परिधान करावा. तुमच्या जीवनातील सर्व ताण निघून जातो आणि आयुष्यात शांती मिळण्यास मदत होते.

नववा दिवस- नवरात्रीचा नववा दिवस माता सिद्धायत्रीला समर्पित आहे. या दिवशी गडद हिरव्या रंगाचे कपडे घालावेत. या दिवशी हिरवा रंग घातल्यामुळे तुमच्या सौभाग्याचे आयुष्य सुखी आणि आनंदी होते.

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.