चैत्र पौर्णिमेला ‘या’ पद्धतीने करा पिंडदान, पूर्वजांचे मिळतील आशीर्वाद
हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि दान करतात. या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा सोबतच पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान देखील केले जाते.

हिंदू धर्मात पौर्णिमेची तिथी खूप पवित्र मानली जाते. दर महिन्याला पौर्णिमा येत असते. हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस असतो. महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडले आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात सनातन धर्माला विशेष महत्त्व आहे. दरम्यान चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान केले जाते. तसेच या दिवशी भाविक गंगा नदीसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तसेच दानधर्म देखील करतात. असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे. कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
या दिवशी पूजा करताना, भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला नारळ आणि तांदळाची खीर अर्पण केली जाते. त्यासोबत चैत्र पौर्णिमेची ही तिथी पूजेबरोबरच पूर्वजांसाठी खूप महत्वाची आहे. या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो. व आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. अशा परिस्थितीत, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पिंडदान कोणत्या पद्धतीने करावे ते जाणून घेऊया.
चैत्र पौर्णिमा कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजुन 21 मिनिटांनी सुरू होईल. ते 13 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजुन 21 मिनिटांनी संपेल. हिंदू धर्मात उदय तिथी मानली जाते. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, चैत्र पौर्णिमा 13 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
पिंडदान करण्याची पद्धत
चैत्र अमावस्येच्या दिवशी सर्वप्रथम स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. नंतर एक वेदी बनवा आणि त्यावर पूर्वजांचे चित्र ठेवा. नंतर वेदीवर काळे तीळ, जव, तांदूळ आणि कुश ठेवा. यानंतर, शेण, पीठ, तीळ आणि जवपासून एक गोळा बनवा. मग तो नैवेद्य पूर्वजांना अर्पण करा. पूर्वजांचे मंत्र जप करा. त्यांना पाणी अर्पण करा. लक्षात ठेवा की पूर्वजांसाठी पिंडदान नेहमीच जाणकार पुरोहिताच्या उपस्थितीत केले पाहिजे. पिंडदानानंतर ब्राह्मणांना जेवण द्या आणि त्यांना दान देखील द्या.
पिंडदानाचे नियम
गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीच्या काठावर जाऊन तुमच्या पूर्वजांसाठी पिंडदान करा. नेहमी दुपारच्या वेळेस पिंडदान करा. पूर्वजांना पिंडदान करण्यासाठी दुपारची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पिंडदान करताना, तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा. त्याच्या आशीर्वादासाठी त्यांची प्रार्थना करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)