महिलांना त्यांचे वय आणि पुरुषाला त्याचा पगार का विचारु नये? यामागे दडलंय मोठं गुपित
चाणक्य नीतीनुसार, स्त्री तिचे कुटुंब आणि पुरुष त्याचे कुटुंब पोसण्यासाठी त्याग करतो. स्त्रीचे वय विचारणे तिच्या समर्पणाचा आणि पुरुषाचे उत्पन्न विचारणे त्याच्या जबाबदारीचा अपमान आहे. हे प्रश्न त्यांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करतात आणि त्यांच्या योगदानाला कमी लेखतात.

आपण अनेकदा गंमतीत पुरुषाला त्याचा पगार आणि महिलांना त्यांचे वय विचारु नये असे म्हणतो. पण यामागे दडलेला विचार काय आहे, याबद्दल आपल्याला कोणीही सांगत नाही. आचार्य चाणक्य यांनी महिलांना वय आणि पुरुषांना त्यांचे उत्पन्न का विचारु नये, याबद्दलचे कारण सांगितले आहे. या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीच्या त्याग, समर्पण आणि सामाजिक स्थितीशी संबंधित आहे. आश्चर्य वाटलं ना…पण हे खरं आहे.
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलेली ‘चाणक्य नीती’ आजही जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये मार्गदर्शक ठरते. याच चाणक्य नीतीमध्ये स्त्रीला तिचे वय आणि पुरुषाला त्याचे उत्पन्न विचारणे योग्य मानले जात नाही, असे आचार्य चाणाक्य यांनी सांगितले आहे. यामागील नेमकं कारणही त्यांनी सांगितले आहे.
महिलांचे वय का विचारु नये?
चाणक्य नीतीनुसार, एक स्त्री तिचे जीवन तिच्या कुटुंबासाठी समर्पित करते. ती मुलांची काळजी घेते, पतीला आयुष्यभर साथ देते, कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवते. तिची ओळख तिच्या वयापेक्षा तिच्या कुटुंबातील जबाबदाऱ्यांशी जास्त प्रमाणात जोडलेली असते. त्यामुळे वय वाढणे हा तिच्यासाठी फारच लहान विषय असतो. तिचं खरं समाधान कुटुंबाच्या आनंदात असते.
मात्र तरीही समाजात अनेकदा महिलांच्या वयाबद्दल चर्चा केली जाते. त्याचे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले जाते. याच दबावामुळे आणि मानसिकतेमुळे अनेक स्त्रिया आपलं खरं वय सांगत नाहीत.
पुरुषांचे उत्पन्न आणि कौटुंबिक जबाबदारी
आचार्य चाणक्य सांगतात की पुरुषाच्या कमाईवर केवळ त्याचेच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य अवलंबून असते. आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहावे यासाठी तो दिवसरात्र मेहनत करत असतो. त्याची कमाई ही त्याच्या जबाबदारीचे प्रतीक असते. सध्या समाजात पुरुषाच्या उत्पन्नावरून त्याचा मान-सन्मान आणि सामाजिक दर्जा ठरवला जातो. अनेकदा उत्पन्नावरु इतरांशी तुलनाही केली जाते. मात्र आपल्या उत्पन्नामुळे आपल्याला किंवा कुटुंबाला कोणी आपल्याला कमी लेखू नये, यासाठी अनेक पुरुष खरे उत्पन्न उघड करणं टाळतात.
आचार्य चाणक्यांचा खरा संदेश काय?
आचार्य चाणक्य यांचा या विचारांमागील खरा संदेश असा आहे की, स्त्री आणि पुरुष दोघेही कुटुंबासाठी मोठा त्याग करत असतात. स्त्री कुटुंबासाठी आपले संपूर्ण जीवन घालवते आणि पुरुष त्यांच्या पालनपोषणासाठी संघर्ष करतो. अशा परिस्थितीत, स्त्रीला तिच्या वयाबद्दल विचारणे किंवा पुरुषाला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारणे, हे त्यांच्या योगदानाचा अनादर करण्यासारखे आहे, असे चाणक्य नीती मानते. या प्रश्नांमुळे त्यांच्या त्यागाला कमी लेखले जाते. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावण्याऐवजी त्यांच्या त्यागाचा आदर करायला शिकणे महत्त्वाचे आहे.