Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगला जीवनसाथी हवाय? चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यभर राहाल सुखी

वैवाहिक जीवनात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा नवीन जीवनसाथी निवडणार असाल तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी. आचार्य चाणक्य नीती यांच्या विचार लक्षात घेऊन तुम्हाला एक चांगला जीवनसाथी निवडण्यास मदत होऊ शकते.

चांगला जीवनसाथी हवाय? चाणक्यांच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यभर राहाल सुखी
chanakyaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 11:43 AM

आचार्य चाणक्य यांच्या नुसार तुम्ही जर काही गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्हाला एक चांगला जीवनसाथी निवडण्यास मदत होऊ शकते. कारण, चाणक्य नीती जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन करत असतात. विवाह हा जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय असून चाणक्य यांनी जीवनसाथी निवडण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यात जोडीदाराचे चारित्र्य सर्वात महत्त्वाचे असते. सदाचारी व्यक्तीच तुमच्यासोबत सुखी जीवन व्यतीत करू शकते. वैवाहिक जीवनात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा नवीन जीवनसाथी निवडणार असाल तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी.

आचार्य चाणक्य म्हणतात की जोडीदाराने नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवता येत नाही. एक दयाळू व्यक्तीच इतरांच्या भावना समजून घेऊ शकते आणि आपल्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकते. आयुष्यात चढ-उतार येतातच. सहिष्णू व्यक्तीच या चढउतारांना तोंड देऊ शकते.

आचार्य चाणक्य यांची नीती जर प्रत्येक माणसाने त्यांनी दिलेली शिकवण आपल्या जीवनात अंगीकारली तर त्याला नक्कीच यश मिळते. मैत्री, नोकरी किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या असतील तर चाणक्यच्या काही गोष्टींचे पालन केल्याने सर्व संकटे आणि क्लेश दूर होतात. जर तुम्ही स्वतःसाठी चांगला जीवनसाथी, प्रत्येक सुख-दु:खात तुमच्या सोबत असणारी पत्नी शोधत असाल तर तिच्यात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे गुण नक्की शोधा.

भरपूर प्रगती मिळवा

आचार्य चाणक्य यांच्या मते स्वभावाने शांत आणि संयमी स्त्रिया हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा स्त्रिया घराला शांती देतात, असा त्यांचा विश्वास आहे. तसेच ज्या व्यक्तीशी त्यांचा संबंध येतो त्या व्यक्तीची आयुष्यात बरीच प्रगती होते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री केवळ घरच नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांमध्येही सुधारणा घडवून आणते. अशा महिलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. ते प्रत्येक परिस्थिती सहजपणे हाताळतात, तसेच कोणताही निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

घरातील काच अचानक तुटणे

घरातील काच अचानक तुटली किंवा इतर काही कारणाने काच फुटली तर तेदेखील अशुभ चिन्ह मानले जाते. यावरून आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधले जाते. काचेहचा ग्लास फुटलेला असेल तर तो लगेच काढून टाकण्याचा किंवा लगेच बदलून टाका.

चाणक्ययांच्या नीतींचे पालन करून एक सामान्य बालक म्हणजेच चंद्रगुप्त मोठा होऊन सम्राट झाला असे मानले जाते. चाणक्य यांची धोरणे आजच्या काळातही समर्पक मानली जातात. अनेकदा असे घडते की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो आपल्याला फसवतो. अशा वेळी चाणक्ययांच्या या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

घाईगडबडीत निर्णय घेऊ नका

आचार्य चाणक्य यांच्यानुसार आयुष्यासाठी जीवनसाथी निवडताना घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. जीवनसाथी निवडताना आपल्या पालकांचा आणि मित्रांचा सल्ला नक्की घ्या. पण शेवटी आपल्या मनाचं ऐकून घ्या आणि ज्याच्यासोबत तुम्ही सुखी राहू शकाल आणि आयुष्य पूर्णपणे घालवू शकाल त्या व्यक्तीची निवड करा. कारण अनेकदा घाईगडबडीत घेतलेला निर्णय लोकांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जीवनसाथी निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्या, जेणेकरून तुम्हाला आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर.
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्.
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.