Chanakya Niti : चाणक्य नीतीमधील ‘या ‘ 4 गोष्टी कराच! पैशाची कमतरता कधीच भासणार नाही
चाणक्य नीतीमधील एका भागामध्ये आपण देवी लक्ष्मीला कसे प्रसन्न करु शकतो याबद्दल सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
मुंबई : आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवनाशी संबंधित सर्व पैलू सांगितले आहेत.आचार्य चाणक्य हे कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी आयुष्यात खूप संकटे पाहिली पण न डगमगता त्यांनी त्या संकटांचा सामना केली. त्यातून मिळालेले अनुभव त्यांनी चाणक्या नीतीमधून सर्वांसमोर आणले आहेत.आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर बराच काळ तेथे शिक्षक म्हणून काम केले. यादरम्यान आचार्य यांनी अनेक रचनाही केल्या. त्यांच्या काही रचना आजही खूप लोकप्रिय आहेत. चाणक्य नीती देखील त्यापैकीच एक आहे. यामधील एका भागामध्ये आपण देवी लक्ष्मीला कसे प्रसन्न करु शकतो याबद्दल सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
1. घराची स्वच्छता आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर घराची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवलेत तर अशा वस्तुमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो.
2.पैशाचा चुकीची वापर करु नका आपल्याकडे असलेल्या पैशाचा कधीच चुकीचा वापर करु नका. त्या पैशामुळे तुमच्या वागण्यात बदल होईल असे कधीही वागू नका. ज्या ठिकाणी पैशाचा आदर केला जातो तेथे माता लक्ष्मीचा वास असतो.
3. वाईट मार्गाने पैसे कमवू नका चाणक्य नीतीनुसार, फसवणूक किंवा चुकीच्या कामातून कमावलेली, कधीही तुमच्यासोबत राहत नाही. अशा संपत्तीमुळे तुमचे वैयक्तीक नुकसान देखील होते. त्यामुळे पैसे नेहमी चांगल्या मार्गानी येतील याची काळजी घ्यावी.
4. पैसा जतन करुन ठेवा चाणक्या नीती नुसार आपल्याकडे असणारा पैसा आपण जतन करून ठेवला पाहिजे. जेव्हा आपण पैसा जपतो किंवा योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूतक करतो तेव्हा पैसा वाढतो. त्यामुळे आपण पैशाची बचत करायला हवी.
संबंधित बातम्या
Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?