Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच…!

Chanakya Niti : असं म्हणतात की एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या दु:खाचे स्वत:च कारण असतो. परंतु जर ही गोष्ट वास्तविकतेच्या आधारावर तपासून पाहिली तर काही वेळा एखादी परिस्थिती एखाद्या व्यक्तीला दु:खी होण्यास भाग पाडते.

Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच...!
Acharya_Chanakya
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 8:03 AM

Chanakya Niti : असं म्हणतात की एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या दु:खाचे स्वत:च कारण असतो. परंतु जर ही गोष्ट वास्तविकतेच्या आधारावर तपासून पाहिली तर काही वेळा एखादी परिस्थिती एखाद्या व्यक्तीला दु:खी होण्यास भाग पाडते. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे जो परिस्थितीचा गुलाम आहे. परिस्थितीतून बाहेर पडणे, मन स्थिर ठेऊन परिस्थितीवर विजय मिळवणं या वाटतात तेवढ्या सहज आणि सोप्या गोष्टी नाहीयत तसंच सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या हाती बऱ्याच गोष्टी नसतात. मग अशा कोणत्या परिस्थिती असतात, तिथे सगळं काही केल्यानंतरही माणसाला वाट्याला त्या क्षणाला दु:खच येतं, आपण पाहूया…! (Chanakya Niti No matter how much you do in these 6 situations man is still sad)

आचार्य चाणक्य यांनी देखील चाणक्य नितीत अशा घटनांचं वर्णन केले आहे ज्यामध्ये माणूस दररोज कणाकणाने जळत असतो. या परिस्थितीत अडकलेल्या माणसाचे मन दररोज आगीसारखे जळत असते. त्या 6 परिस्थिती कोणत्या, तर पुढीलप्रमाणे….

कांता-वियोग: स्वजनामानो, ऋणस्य शेष: कुनृपस्य सेवा दरिद्रभावो विषमा सभा च, विनाग्निना ते प्रदहन्ति कायम्

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची बायको किंवा प्रेयसीशी असलेले संबंध खूप मधुर असतात. पण जेव्हा या नात्यात दुरावा येतो तेव्हा प्रत्येकजण अस्वस्थ होतो. अशी व्यक्ती मनामध्ये प्रत्येक क्षण आगीसारखी जळत असते. प्रत्येक क्षणी त्याच्या मनात याच गोष्टींचं तांडव सुरु असतं.

2.अपमान एक घोट आहे जो कुणालाही प्यावासा वाटत नाही. एखाद्या व्यक्तीस त्याच्या मित्राने किंवा नातेवाईकाने अपमानास्पद वागणूक दिली तर तेव्हाची परिस्थिती त्याला खूप अस्वस्थ करते. अशी व्यक्ती इच्छा असूनही आपला अपमान विसरु शकत नाही. त्याच्या मनात तो अपमान कायमस्वरुपी घर करुन राहतो.

3. एखाद्याकडून कर्ज घेणे खूप सोपे आहे, परंतु ते परत करणे तितकेच कठीण आहे. एखाद्याने दुसऱ्याकडून कर्ज घेतल्यानंतर ते आपल्याला फेडायचंय हा विचार त्याच्या मनात सतत येत असतो. कर्जाचा विचार माणसाला शांत झोपू देत नाही.

4. जे लोक कपटी किंवा चरित्रहिन लोकांच्या सेवेशी असतात, ते लोक नेहमी दु:खी असतात. असे लोक प्रत्येक क्षणी चांगल्या-वाईटाचा विचार करत असतात. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजतं.

5. आपल्याकडे गरीबी हा एक शाप समजली जाते. खरं तर, गरीब माणूस पैशांअभावी बऱ्याच गोष्टी पणाला लावतो. त्याला आयुष्यात बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच गरीब माणूस नेहमीच दु: खी असतो आणि तो नेहमी आपलं दारिद्र्य आपल्या मनात ठेवत राहतो.

6. खूप लोकांसाठी आपण खूप काही केले तरी हे ते कधीही स्वीकारत नाहीत. एखाद्या व्यक्तीला अशा लोकांमध्ये रहावं लागलं तर ती एक प्रतारणा आहे. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अस्वस्थ होते आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करते.

(Chanakya Niti No matter how much you do in these 6 situations man is still sad)

हे ही वाचा :

Chanakya Niti | व्यक्तीच्या या चार सवयींमुळे लक्ष्मी टिकत नाही, संपूर्ण आयुष्य काढावं लागतं गरिबीत

Chanakya Niti | ज्या व्यक्तीत असतात हे 4 गुण, ती मोठ्या-मोठ्या संकटांना तोंड देऊ शकते

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.