Chanakya Niti | भ्रष्ट स्त्रीसाठी पती सर्वात मोठा शत्रू, लोभी आणि मूर्ख व्यक्ती कुणाला शत्रू मानतात? जाणून घ्या
आचार्य चाणक्य यांच्या नीती योग्य पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात (Chanakya Niti Revealed About Corrupt Woman).
मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीती योग्य पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात (Chanakya Niti Revealed About Corrupt Woman). आपल्या ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याला कोणीही तोडू शकत नाही. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनातील जवळजवळ सर्व पैलूवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोक आणि त्यांच्या प्रवृत्तीबाबत चेतावणी देत त्यांच्यावर कधीही विश्वास न ठेवण्याचा सल्ला देतात (Chanakya Niti Revealed About Corrupt Woman, Greedy Man, Thieves And Fools).
लुब्धानां याचकः शत्रुः मूर्खाणां बोधको रिपुः जारस्त्रीणां पतिः शत्रुश्चौराणां चंद्रमाः रिपुः
1. आचार्य चाणक्य यांच्यानुसार एक भ्रष्ट आणि वाईट चरित्र असलेल्या महिलेबाबत म्हटलं गेलं आहे की अशी महिला कधीही विश्वास करण्यासारखी नसते. ती नेहमी परपुरुषांकडे आकर्षित राहाते. अशात तिच्यासाठी तिचा पती सर्वात मोठा शत्रू असतो. कारण तो तिच्या ध्येयांमध्ये बाधा बनतो.
2. लोभी व्यक्ती जिथे जाईल तिथे तीचे सर्व लक्ष तेथील महागड्या वस्तू आणि पैशांकडे असते. तो सर्वकाही आपल्याकडे जमा करण्याची मंशा ठेवतो. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये, कारण संधी मिळताच ते फायदा उचलतात. अशा लोकांना दारावर आलेला याचकही शत्रू वाटतो. कारण अशी व्यक्ती कुणालाही काहीही देऊ इच्छित नाही.
3. मूर्ख व्यक्तीला नेहमी असं वाटतं की तो सर्वात जास्त बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याला कोणाचं ज्ञान देणे पसंतीस पडत नाही. तो नेहमी स्वत:ची गोष्ट बरोबर सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याला ज्ञानी व्यक्तीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते आणि तो ज्ञानी पुरुषाला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो.
4. चोरासाठी त्याचा सर्वात मोठा शत्रू हा चंद्रमा असतो. कारण तो चोरीसाठी नेहमी अंधेराच्या शोधात असतो. जेणेकरुन त्याची ओळख समोर येऊ नयो. पण, चंद्रमाचा प्रकाश अंधाराला दूर करतो.
Chanakya Niti : ‘हे’ पाच गुण तुमच्यात असतील, तर तुम्ही जीवनात कुठली समस्या सोडवू शकताhttps://t.co/UNcXBSmWUu#ChanakyaNiti
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2021
Chanakya Niti Revealed About Corrupt Woman, Greedy Man, Thieves And Fools
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | ‘या’ सात गोष्टी खाल्ल्यानंतरही तुम्ही पूजा-अर्चना करु शकता
Chanakya Niti : मन स्थिर नसेल तर आयुष्यात असंख्य अडथळे, वाचा काय आहे सुखी जीवनाचा मंत्र