Chanakya Niti | आयुष्यात कोणाला पैसे देताना आचार्य चाणक्यांनी सांगितलेली फक्त 1 गोष्ट लक्षात ठेवा, पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही

भारतात चाणक्य नीतीला विषेश महत्व आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आयुष्य जगण्याची निती (chanakya niti) आजच्या काळातही लागू पडते, आचार्य चाणक्य यांनी आपल्या धार्मिक शास्त्रात जे काही सांगितले किंवा लिहिले आहे ते खूपच व्यावहारिक आहे.

Chanakya Niti | आयुष्यात कोणाला पैसे देताना आचार्य चाणक्यांनी सांगितलेली फक्त 1 गोष्ट लक्षात ठेवा, पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही
Acharya chanakya
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 8:10 AM

मुंबई : भारतात चाणक्य नीतीला विषेश महत्व आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आयुष्य जगण्याची निती (chanakya niti) आजच्या काळातही लागू पडते, आचार्य चाणक्य यांनी आपल्या धार्मिक शास्त्रात जे काही सांगितले किंवा लिहिले आहे ते खूपच व्यावहारिक आहे. आचार्य चाणक्य यांनी धर्म, समाज, नातेसंबंध, अर्थशास्त्र, राजकारण इत्यादी विषयांवर त्यांच्या धोरण या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे. जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्याच्या वचनांचे पालन केले तर त्या व्यक्तीला जीवनातील सर्व समस्यांवर सहज उपाय सापडतात. चाणक्याचे वचन जीवनात आणले तर संकटांवर सहज मात करता येते. आचार्य चाणक्य हे महान रणनीतीकार होते. चाणक्य नीती (chanakya niti quotes) मध्ये ढग आणि पैसा यांचा संबंध खूप छान सांगितला आहे.

असे म्हणतात की चाणक्यच्या धोरणांचे आणि सूत्रांचे पालन करणार्‍या व्यक्तीला जीवनात कधीही दुख: सहन करावे लागत नाही. आचार्या चाणक्यांची धोरणे आत्मसात करणे कठीण असू शकते, परंतु जर ती तुम्ही केलीत तर तुमचे आयुष्यमार्गाला लागेल. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये पैशाच्या चांगल्या वापराबद्दल सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीच्या आठव्या अध्यायात वर्णन केलेल्या पाचव्या श्लोकाद्वारे सांगितले आहे

चाणक्या नीतीचा श्लोक  वित्तं देहि गुणान्वितेषु मतिमन्नान्यत्र देहि क्वचित, प्रात्मं वारिनिधेर्जलं घनमुखे माधुर्ययुक्तं सदा, जीवान्स्थावरजड्गमांश्र्च सकलान्संजीव्य भूमण्डलं, भूय: पश्य तदेव कोटिगुणितं गच्छन्तमम्भोनिधिम.

श्लोकाचा नेमका अर्थ काय चाणक्याने सांगितलेल्या या श्लोकामध्ये त्यांनी सांगितले आहे की जर तुम्ही कोणाला पैशाची मदत करत असाल तर तो व्यक्ती कसा आहे? आणि तो कोणत्या गोष्टीसाठी पैसे मागत आहे या सर्व गोष्टी तुम्ही पासखून घेतल्या पाहीजेत. आचार्य चाणक्यांच्या मते जो बुद्धिमान असतो, तो तुमची संपत्ती योग्य ठिकाणी लावून तुम्हाला चांगला मोबदला देतो. हे उदाहरण समजवून सांगताना आचार्य चाणक्य यांनी ढगाचे उदाहरण दिले आहे. ज्या प्रकारे ढग समुद्रातून पाणी घेऊन थंड व पिण्याच्या पाण्याचा पाऊस पाडतो आणि त्यानंतर या जगाचे जीवनचक्रही त्या पाण्याने चालते. आजच्या काळात पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचे संरक्षण पाण्यामुळे होत आहे. तसेच समजूतदार माणूसही कोणाकडून पैसे घेऊन प्रगतीच्या कामात वापरतो, त्या पैशातून इतरांचे भले करतो. म्हणूनच समंजस माणसाला पैसे द्यावेत, ज्यातून त्या पैसाचा चांगला उपयोग होईल.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Somavati Amavasya 2022 | सोमवती अमावस्येची आख्यायिका काय? जाणून घ्या पूजेची पद्धत

Debt Relief | आज चुकूनही कर्ज घेऊ नका, नाहीतर तुमच्यावर संक्रांत आलीच म्हणून समजा

Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.