Chanakya Niti : ‘या’ दोन गोष्टी म्हणजे यशाची चावीच; आर्य चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ कुटनीतीतज्ज्ञ आणि राजनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ कुटनीतीतज्ज्ञ आणि राजनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली. ज्यामध्ये आदर्श जीवन कसं असावं, व्यक्तीनं आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नयेत? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत? आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षण काय आहेत? आपला मित्र कोण, आपला शत्रू कसा ओळखावा? अशा एक ना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती नावाच्या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी जर व्यक्तीकडे असतील तर चाणक्य म्हणतात जगातील कोणतीच ताकद तुम्हाला यश मिळवण्यापासून थांबवू शकणार नाही, यश हे तुमचंच असणार आहे. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं त्याबद्दल.
आर्य चाणक्य म्हणतात मेहनत ही एक अशी गोष्ट आहे. जगात मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही जर ठरवलं मला आयुष्यात ही गोष्ट मिळवायची आहे, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागले. जगात तुम्हाला फुकट मेहनत न करता कोणतीच गोष्ट मिळत नाही. त्यामुळे आयुष्यात कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुम्ही जी मेहनत करत आहात, तीची दिशा योग्य पाहिजे, तसेच तिला प्रामाणिकपणाची साथ असावी, तर यश तुम्हाला हमखास मिळेलच असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आर्य चाणक्य दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलताना सांगतात की तुम्ही जरी कठोर परिश्रम करत असाल मात्र तुमच्याकडे नम्रता नसेल तर तुमच्या मेहनतीला फळ मिळणार नाही. त्यामुळे आयुष्यात नम्र राहायला शिका. कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका, तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून मेहनत करा, यश तुम्हाला मिळणारच असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.