या ५ वाईट सवयी, आईच्या पोटात असतानाच शिकतात महिला, तिसऱ्याची मोठी चर्चा
Chanakya Niti : आचार्य चाणक्यने स्त्रीयांचे स्वभाग गुणधर्म सांगितला आहे. आचार्य चाणक्यच्या मते, या पाच वाईट सवयी महिलांना अगोदरच मिळतात. अशा कोणत्या आहेत त्या वाईट सवयी?

Chanakya Niti : स्त्रीच्या मनात काय असते हे कोणालाच कधी कळत नाही, असे म्हणतात. स्त्रीचा स्वभावाचा ठाव घेणे कठीण असल्याचे सांगण्यात येते. भारतातील चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते. आचार्य चाणक्य यांनी महिलांच्या स्वभावाविषयी काही दावे केले आहेत. आचार्य चाणक्यने स्त्रीयांचे स्वभाग गुणधर्म सांगितला आहे. आचार्य चाणक्यच्या मते, या पाच वाईट सवयी महिलांना अगोदरच मिळतात. अशा कोणत्या आहेत त्या वाईट सवयी?
चाणक्य नीतीनुसार,
अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभिता। अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषा: स्वभावजा:।।




या श्लोकातून आचार्य चाणक्य याने स्त्रीयांच्या पाच वाईट सवयींचा ऊहापोह केला आहे. त्यातील गमक त्यांनाच ठाऊक आहे. तुम्हाला या गोष्टी तर्कसंगत वाटतीलच असे नाही. अथवा हा दावा पटेलच असे पण नाही. हे त्यांचा तर्क आहे. तर तो तर्क समजून घेऊयात.
विचार न करता काम करणे
आचार्य चाणक्याच्या दाव्यानुसार, महिला मोठ्या उत्साहाने काम करतात. त्या काम करण्यासाठी उतावळ्या होतात. पण त्याचे चांगले वाईट, नफ्या-तोट्याचे गणित त्या सहसा लक्षात घेत नाहीत. अचानक त्या मोठे पाऊल टाकतात. पण मग कोणताही विचार न करता केलेला हा पराक्रम अंगलट येतो. त्याचे त्यांना वाईट वाटते.
नगण्य, किरकोळ गोष्टीत जीव गुंतवणे
महिला जन्मतःच लालची असतात, असा शेरा आचार्य चाणक्य देतात. नगण्य, किरकोळ गोष्टीत त्यांचा जीव गुंततो. हे सर्व अनाकलनीय आहे, असे ते म्हणतात. त्यांना इतर स्त्रीयांविषयी हेवा वाटतो. काही स्त्रीया आलिशान आयुष्य जगण्यासाठी मग वाईट पाऊल सुद्धा टाकतात.
महिला असतात मूर्ख
आचार्य चाणक्यच्या मते, महिलांमध्ये मूर्खपणाचा अवगुण असतो. महिला सहजरित्या वाईट माणसावर अधिक विश्वास ठेवतात. पण चांगल्या माणसाची पारख करायला वेळ घेतात. बोलघेवड्या आणि स्तुतिबहाद्दरांकडून त्या सहज फसवल्या जातात. त्यांना चांगलं आणि वाईटातील अर्थ कळत असा नाही, पण सद्सदविवेक बुद्धीचा वापर न केल्याने त्यांची लागलीच फसवणूक होते.
अस्वच्छतेचा तिटकारा नाही
चाणक्य नीतीनुसार, महिलांना अस्वच्छतेचा तिटकार नसतो. त्यांना घराची साफ-सफाई, स्वच्छतेविषयी सांगत राहावे लागते. त्यांना शारीरिक स्वच्छेतीची पण फारशी आवड नसते. हा एक अवगुण असल्याचे चाणक्य नीती सांगते.
असंवेदनशील असतात महिला
आचार्य चाणक्यच्या मते, महिला पुरूषांपेक्षा अधिक निर्दयी, असंवेदनशील असतात. स्वतःच्या स्वार्थापुढे त्यांच्यासाठी इतर गोष्टी गौण असतात. महिला स्वार्थासाठी संसार सोडून जाऊ शकतात. कठोर निर्णय घेऊ शकतात.
डिस्क्लेमर : ही माहिती ऑनलाईन स्त्रोतावरून ज्योतिषाच्या माहितीआधारे देण्यात आली आहे. या माहितीला टीव्ही ९ मराठी अजिबात दुजोरा देत नाही. अंधश्रद्धा वाढवण्याचा वा कोणाला कमी लेखण्याच्या प्रयत्नाचे आम्ही समर्थन करत नाही.