Chanakya Niti: एखाद्या व्यक्तीचे खरे रूप जाणून घायचे आहे? मग चाणक्य नीतीच्या ‘या’ गोष्टी ठेवा ध्यानात!
एखादी व्यक्ती चांगली की वाईट हे तुम्ही त्याच्या कर्मावरून सहज ओळखू शकता. जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असेल आणि प्रत्येक गोष्ट चुकीच्या मार्गाने करत असेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहा.
आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांची धोरणे आणि विचार थोडे कठोर वाटले तरी हीच कठोरता जीवनाचे सत्य आहे. धावपळीच्या जीवनात तुम्हाला कदाचित या धोरणांचा विसर पडला असेल पण आचार्य चाणक्य यांची नीती (Chanakya neeti) तुम्हाला अनेक संकटांपासून वाचवू शकते. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी आणखी एका विचाराचे विश्लेषण करणार आहोत. आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जाणून घेतल्यास तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचे खरे रूप (personality test) कळू शकेल.
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः । तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा ॥
सोन्याची परीक्षा त्याला घासून,कापून, तापवून आणि ठोकून केली जाते. त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याच्या त्याग,आचरण, गुण आणि कर्माने होते.
आचार्य चाणक्यांच्या या विधानानुसार, ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा त्याला घासून,कापून, तापवून आणि ठोकून केली जाते. त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याच्या त्याग,आचरण, गुण आणि कर्माने होते. एखाद्या व्यक्तीकडे पाहून, आपण त्याची योग्यता ठरवू शकत नाही. सोन्यालासुद्धा त्याची शुद्धता सिद्ध करण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचे खरे रूप जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याची परख त्याग, आचरण, गुण आणि कर्माने करू शकता.
त्याग
एखादी व्यक्ती निस्वार्थपने त्याग करू शकते का? यावरून तिची परीक्षा घेणे शक्य आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती इतरांच्या सुखात आनंदी असते तसेच दुखातही स्वतःच्या सुखाचा त्याग करून दुसऱ्याला मदत करते अशी व्यक्ती विश्वासास पात्र आहे असे समजावे. दुसरीकडे, जर एखादी व्यक्ती तुमच्या सुखात सोबत आहे आणि दुःखात मदत मागितल्यावर करणे देत असेल किंवा तुम्हाला टाळत असेल तर त्या व्यक्तीला लगेच तुमच्या आयुष्यातून दूर करा.
आचरण
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या वागणुकीकडे लक्ष द्या, त्याचे आचरण कसे आहे ते जाणून घ्या. इतरांसोबतच्या त्याच्या व्यवहाराबद्दल जाणून घ्या. सोप्या मार्गाने पैसे कमविणे तसेच आर्थिक गैरव्यवहाराला दुजोरा देत असेल तर ती व्यक्ती वेळ आल्यावर तुम्हालाही संकटात आणू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीपासून कायम दूर राहा.
कर्म
एखादी व्यक्ती चांगली की वाईट हे तुम्ही त्याच्या कर्मावरून सहज ओळखू शकता. जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असेल आणि प्रत्येक गोष्ट चुकीच्या मार्गाने करत असेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहा. कारण चुकीच्या लोकांच्या प्रभावाचा तुमच्या जीवनावरही वाईट परिणाम होऊ शकतो. असे लोकं भावनाशून्य असतात. त्यांच्या कर्माचा त्यांना कधीच पच्छाताप होत नसतो. त्यांच्या सर्व चुकीच्या कर्मांचे त्यांच्याकडे स्पष्टीकरण असते. त्यांच्या कर्माचा नकारात्मक परिणाम तुमच्या छबीवर होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांपासून कायम दूर राहा.
(वरील माहिती चाणक्य नीतीच्या आधारे देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.)