Chanakya Niti : लहान मुलांसमोर या ‘3’ गोष्टी चुकूनही करु नका , नाहीतर …
चाणक्य नीतिशास्त्रानुसार, आपण बोलताना नेहमी विचार करुन बोलायला हवं. शरिराला झालेली जखम काढता येते पण मनाला लागलेले शब्दांची जखम मात्र आयुष्यभर राहते. त्यामुळेच याबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत.
मुंबई : आचार्य चाणक्य हे विद्वान मानले जातात. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांना समोरे जावे लागले होते. पण न डगमगता त्यांनी प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढला. त्यांनी त्याचे अनुभव इतरांना कळावे म्हणून चाणक्या नीती लिहली. यामध्ये आपण आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात हे सांगितले.
चाणक्य नीतिशास्त्रानुसार, आपण बोलताना नेहमी विचार करुन बोलायला हवं. शरिराला झालेली जखम काढता येते पण मनाला लागलेल्या शब्दांची जखम मात्र आयुष्यभर राहते. त्यामुळेच याबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत.
चाणक्या नीतीत लहान मुलांचे संगोपन कसे करावे याबद्द्ल माहिती दिली आहे. त्यामध्ये आपण लहानमुलांसमोर कोणत्या गोष्टी करु नये हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
मुलांसमोर अपशब्द नकोच चाणक्य नीतीमध्ये लहान मुलं आपल्या पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना आपण विचार करायला हवा. पालकांनी मुलांसमोर कधीही चुकीची आणि अव्यावसायिक भाषा इत्यादी वापरू नये. त्याचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो.
पत्नीला सन्मानाने वागवा चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीसोबत अशा गोष्टी कधीही करू नयेत, ज्यामुळे काही कारणाने तिचे हृदय दुखत असेल. तुमच्या पत्नीला नेहमी प्रोत्साहन द्या. पत्नीचा आत्मविश्वास कमी होईल किंवा घरामध्ये कलह निर्माण होईल असे काही वागू नये.
घरातील वातावरण चांगले ठेवा चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, घरातील वातावरण नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील वातावरण जितके चांगले असेल तितकी सकारात्मक ऊर्जा असेल. घरामध्ये शिस्त आणि सजावट पाळली पाहिजे.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या
Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?