Lunar eclipse 2021 for pregnant ladies | शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, या दिवशी गर्भवती महिलांनी 4 गोष्टी चुकूनही करू नये
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवारी होणार आहे. यावेळी सुपरमून होणार आहे. पुराणांच्या मते ज्या दिवशी चंद्रग्रहण होईल त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये असे म्हणतात. एवढेच नाही तर ग्रहण काळात घराबाहेरही पडू नये, असे सांगितले आहे.
मुंबई : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवारी होणार आहे. यावेळी सुपरमून होणार आहे. पुराणांच्या मते ज्या दिवशी चंद्रग्रहण होईल त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये असे म्हणतात. एवढेच नाही तर ग्रहण काळात घराबाहेरही पडू नये, असे सांगितले आहे. या दिवशी जेवढी शक्य तेवढी देवाची पूजा करावी, असंही म्हणतात. यामध्येच गरोदर महिलांसाठी काही प्रथा आहेत. बऱ्याच ज्योतिष विद्वानांचा असा विश्वास आहे की गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणादरम्यान बाहेर पडू नये, तर काहीजण थेट ते पाहण्यास नकार देतात. दुसरीकडे, बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी गरोदर महिलेने चंद्रला पाहील्यास मुलाला शररीक त्रास उद्भवू शकतो.
चंद्रग्रहण म्हणजे काय?
पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण असते, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत अगदी जवळून संरेखित होतात आणि पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते. हे थेट सूर्यप्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, ज्यामुळे त्यावर छाया पडते. दरम्यान, जेव्हा पृथ्वी चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. ब
Lunar eclipse 2021 यावेळी गर्भवती महिलांनी काय करावे?
- चंद्रग्रहणावेळी ग्रभवती महिलांनी घरातच राहावं
- या दिवशी त्यांनी फक्त ताजे अन्न खावे.
- चंद्रग्रहणावेळी शक्य असल्यास काहीतरी दान करावे.
- घराच्या आत किरणांपासून वाचण्यासाठी खिडक्या जाड पडद्यांनी झाकून ठेवल्याची खात्री करा.
- त्यांनी चंद्रग्रहणापूर्वी आणि नंतर दोन्हीवेळी स्नान करावे.
Lunar eclipse 2021 या कालावधीत गर्भवती महिलांनी काय करु नये?
- ग्रहणावेळी झोपू नये
- यावेळी त्यांनी कोणत्याही कामात सहभाग घेणे टाळावे, तिक्ष्ण किंवा शस्त्रांचा वापर करु नये.
- चंद्राकडे किंवा आकाशाकडे पाहणे टाळावे.
- या काळात प्रवास करणे टाळा. बरेच लोक असे म्हणतात की ग्रहण काळात महिलांनी पाणी पिऊ नये. परंतु नंतर ते वैद्यकीयदृष्ट्या शक्य नाही. म्हणूनच, या सर्वांचं पानल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन याची खात्री करा.
कोठून दिसेल ग्रहण
धार्मिक मान्यतांनुसार, सूर्य किंवा चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण याच महिन्यात होणार आहे. हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि अमेरिकेत दिसणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण आंशिक असेल, ज्याचा प्रभाव भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही काळ दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरु शकतो.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.
इतर बातम्या :
Day wise work | शुभफळ मिळण्यासाठी योग्य दिवशी काम करा, बिघडलेली कामंसुद्धा चुटकीसरशी होणार
Day wise work | शुभफळ मिळण्यासाठी योग्य दिवशी काम करा, बिघडलेली कामंसुद्धा चुटकीसरशी होणारhttps://t.co/RPKzdAgLwQ#DayWiseWork | #WhichDayToDoWhichWork | #WorkAccordingtoTheDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021