Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या
यावर्षी शेवटचे चंद्रग्रहण याच महिन्यात होणार आहे. हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि अमेरिकेत दिसणार आहे. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण संपूर्ण भारता कुठेही दिसणार नाही. पण, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही क्षणांसाठी ते नक्कीच दिसणार असल्याची माहिती आहे.
Chandra Grahan 2021 : यंदा नोव्हेंबर महिन्यात दोन मोठ्या गोष्टी घडत आहेत, एकीकडे दिवाळीचा पाच दिवसांचा सण 4 नोव्हेंबरला साजरा झाला, तर काही दिवसांनी 2021 या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहणही होणार आहे. चंद्रग्रहणाचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे.
धार्मिक मान्यतांनुसार सूर्य किंवा चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. यावर्षी शेवटचे चंद्रग्रहण याच महिन्यात होणार आहे. हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि अमेरिकेत दिसणार आहे. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण संपूर्ण भारता कुठेही दिसणार नाही. पण, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही क्षणांसाठी ते नक्कीच दिसणार असल्याची माहिती आहे.
चंद्रग्रहण कधी लागणार
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:34 वाजता लागेल आणि सायंकाळी 5:33 वाजता संपेल.
भारतात सुतक काळ मानला जाणार नाही
चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ मानला जाणार नाही. मात्र, ग्रहणाच्या वेळी सुरुवातीपासूनच सुतकाचे विशेष महत्त्व मानले जात आहे. सुतकाबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. असे म्हणतात की ग्रहणाच्या वेळी देव संकटात असतो, अशा स्थितीत मानसिक पूजा करावी. तसेच, कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करणे टाळावे.
सुतकामध्ये भगवंताचे स्मरण आणि मंत्रांचा सतत जप करावा. ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. 2021 वर्षातील पहिले चंद्रग्रहण 26 मे 2021 रोजी पडले होते.
या राशींवर राहणार ग्रहणाचा प्रभाव
हे चंद्रग्रहण वृषभ आणि कृतिका नक्षत्रात होणार आहे. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. याशिवाय, चंद्रग्रहणाचा प्रभाव मेष, कन्या, तूळ आणि धनु राशीवरही राहील.
चंद्रग्रहणाची आख्यायिका
समुद्रमंथनावेळी स्वरभानू नावाच्या राक्षसाने कपटाने अमृत ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा राक्षस देवतेच्या भूमिकेत येऊन अमृत पीत होता, तेव्हा चंद्र आणि सूर्याची त्याच्यावर नजर होती. याबाबत दोघांनीही भगवान विष्णूंना याची माहिती दिली. त्यानंतर भगवान विष्णूने आपल्या सूर्दशन चक्राने या राक्षसाचे डोके त्याच्या धडापासून वेगळे केले. मात्र, तोपर्यंत अमृताचे काही अंश त्याच्या कंठात उतरल्याने त्याच्या शरिराचे दोन्ही भाग अमर झाले.
डोक्याचा भाग राहू आणि धड केतू या नावाने ओळखले जाऊ लागले. याच घटनेचा बदला घेण्यासाठी राहू आणि केतू वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर ग्रहण लावतात. त्यामुळे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होते.
इंद्राचा अहंकार आणि दुर्वास ऋषींचा शाप, समुद्र मंथनातून प्रकटलेल्या लक्ष्मी देवीची दिवाळीला पूजा का करतात?https://t.co/y03HQrgCw4#Diwali #Diwali2021 #Lakshmipujan #LakshmiPujanMuhurat
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu tips: मनी प्लांट लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
Vastu Tips | वॉलेटमध्ये चुकूनही ठेऊ नका 4 गोष्टी, आयुष्यात संकटच संकट येतील!