Chandra Grahan : 2025मध्ये चंद्रग्रहण कधी होणार, कोणत्या नियमांचे पालन करावे? जाणून घ्या…
Chandra Grahan Muhurta: धार्मिक मान्यतेनुसार, ज्यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळी चंद्रग्रहण असते. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभकार्य किंवा महत्त्वाच्या गोष्टी करू नये. 2025मध्ये नेमकं किती चंद्रग्रहण असणार आहे चला जाणून घेऊया. त्यासोबतच चंद्रग्रहणाच्या दिवशी नेमकं कोणत्या नियमांचे पालन करावे? जाणून घ्या.
हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहणाची घटना पौर्णिमेच्या दिवशी घडते. चंद्रग्रहणाच्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्यावेळी चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळी चंद्रग्रहण मानले जाते. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करत नाही. यंदाच्या वर्षामध्ये म्हणजेच 2025मध्ये एकुण 2 चंद्रग्रहण असणार आहे. चला तर जाणून घेऊया 2025मध्ये कोणत्या चंद्रग्रहण असणार आणि चंद्र ग्रहणाची वेळ काय आहे?
2025मधील पहिलं चंद्रग्रहण :-
ज्योतिषशास्त्रानुसार, 2025मधील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च म्हणजेच फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आसणार आहे. या दिवशी चंद्रग्रहण सकाळी 9.29 वाजल्यापासून ते दुपारी 3.29 पर्यंत असणार आहे. मार्चमधील चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाच्या प्रभाव भारतावर पडणार नाही. मार्चमधील चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, दक्षिण उत्तर ध्रुव, ऑस्ट्रेलिया, आशियाचा काही भाग, अटलांटिक महासागर आणि युरोपमध्ये दिसणार आहे.
2025मधील दुसरे चंद्रग्रहण :-
ज्योतिषशास्त्रानुसार 2025मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा दिवस भाद्रपद पौर्णिमेचा असेल. या दिवशी रात्री 9.47 वाजल्यापासून ते रात्री 12.23 पर्यंत असणार आहे. सप्टेंबरमधील चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. सप्टेंबरमधील चंद्र ग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये पडणार आहे. याशिवाय सप्टेंबरमधील चंद्रग्रहणाचे नियम भारतामध्ये देखील पाळले जाणार आहेत.
- चंद्रग्रहणाच्या वेळी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- चंद्रग्रहण काळात देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नये.
- चंद्रग्रहण काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये.
- चंद्रग्रहणाच्या वेळी देवाच्या मंत्रांचा जप करावा.
- चंद्रग्रहण काळात अन्न शिजवू नये. या काळात अन्न खाणेही टाळा कारण ज्योतीषास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर राहूचा प्रभाव वाढतो.
- चंद्रग्रहणाच्या वेळी झोपणे टाळावे.
- चंद्रग्रहण काळात कात्री, सुया, चाकू इत्यादी धारदार वस्तूंचा वापर टाळावा.
2025 मधील सूर्यग्रहण कधी आहे?
2025 मध्ये चंद्रग्रहणाव्यतिरिक्त दोन सूर्यग्रहण देखील असणार आहेत. 2025मधील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी असणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल, ज्याचा प्रभाव भारतामध्ये पडणार नाही. 2025मधील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला होणार आहे. या सर्य ग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये होणार नाही.