मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना करा या मंत्रांचा जप, सर्व कामांमध्ये मिळेल यश

मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सूर्य देवाची पूजा करून सूर्याला अर्घ्य दिल्याने मनुष्याला शुभ फल प्राप्ती होते. जाणून घेऊ मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देऊन कोणत्या मंत्राचा जप करावा.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना करा या मंत्रांचा जप, सर्व कामांमध्ये मिळेल यश
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 6:48 PM

हिंदू धर्मातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण वर्षाच्या सुरुवातीलाच साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो नाव वेगळे असले तरी आनंद उत्साह सर्वत्र सारखाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करण्यासोबतच स्नान आणि दान करायला देखील विशेष महत्त्व आहे. सणाच्या दिवशी दुसऱ्यांनाही आनंद देता यावा यासाठी दान केले जाते. या दिवशी सूर्य देवाची पूजा करणे आणि सूर्याला अर्घ्य देणे खूप शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करताना काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीला जीवनातील सर्व कार्यात यश प्राप्त होते.

कधी आहे मकर संक्रांत?

हिंदू वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला मंगळवारी आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून सकाळी 09:03 मिनिटांनी मकर राशि प्रवेश करतील.

मकर संक्रांतीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप

सूर्य बीज मंत्र

हे सुद्धा वाचा

ॐ हूं सूर्याय नम:

सूर्य शक्ति मंत्र

ॐ सूर्याय आदित्याय श्री महादेवाय नमः

सूर्य सिद्धि मंत्र

ॐ सूर्याय सुर्याय नमः

सूर्य यंत्र मंत्र

ॐ हं सूर्याय नमः

गायत्री मंत्र

ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।।

आदित्य हृदयम मंत्र

नमस्कारं च देवेशं लोकनाथं जगतां पतिं। सूर्यमस्तकं बध्यं ब्राह्मणं बद्धमाश्रयेत्॥

मकर संक्रांत सणाचे महत्त्व

मकर संक्रांत हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक नवीन पिकासाठी देवाचे आभार मानतात. या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. तसेच ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या सोबतच जीवनात सकारात्मक बदल होतात आणि समृद्धी येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.