Good Luck Mantra | प्रत्येक दिवस होईल शुभ, पूर्ण होतील सर्व कामं, या मंत्रांनी करा दिवसाची सुरुवात
सनातन परंपरेत, दिवस शुभ करण्यासाठी अनेक उपाय दिले गेले आहेत. ज्यात मंत्रांचे पठण हा एक सोपा आणि सहज उपाय आहे. आपला दिवस चांगला सुरु करायचा असेल तर त्यासाठी काही काम करण्यापूर्वी तुम्हाला फक्त एक मंत्राचे पठण करावा लागेल. विशिष्ट कार्याशी संबंधित हे मंत्र आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतील.
मुंबई : असे म्हणतात की जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर दिवस चांगला जातो. हे बऱ्याप्रमामात खरे आहेत, कारण जर पाया चांगला असेल तर घरही मजबूत बनते. सनातन परंपरेत, दिवस शुभ करण्यासाठी अनेक उपाय दिले गेले आहेत. ज्यात मंत्रांचे पठण हा एक सोपा आणि सहज उपाय आहे. आपला दिवस चांगला सुरु करायचा असेल तर त्यासाठी काही काम करण्यापूर्वी तुम्हाला फक्त एक मंत्राचे पठण करावा लागेल. विशिष्ट कार्याशी संबंधित हे मंत्र आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतील. या मंत्रांविषयी जाणून घ्या, ज्यामुळे सर्व अडथळे दूर होतील आणि कार्य यशस्वी होतील (Chanting Mantras Start Your Day By Chanting These Mantras Everyday For Good Luck) –
सकाळी उठल्याबरोबर हा मंत्र वाचा
हा दिवस शुभ करण्यासाठी प्रत्येक सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि डोळे उघडताच दोन्ही हातांच्या तळहाताने भगवान सूर्याचा हा मंत्र वाचा. पलंगावर बसूनच या मंत्राचे पठण करा –
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।।
अंथरुण सोडण्यापूर्वी हा मंत्र वाचा
अंथरुणावरुन खाली उतरण्यापूर्वी पृथ्वी देवीचा हा मंत्र जपा. या मंत्राद्वारे आपले पाय जमिनीवर ठेवण्याच्या विवशतेबाबत क्षमा मागितली पाहिजे.
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे।।
आंघोळ करताना हा मंत्र वाचा
सकाळी उठल्यानंतर रोजच्या नित्यक्रियेनंतर तुम्ही आंघोळ करायला गेल्यानंतर स्नान करताना खाली दिलेला मंत्र जपा. शक्य असल्यास आपल्या आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब मिसळा. मंत्र स्नान केल्याने तुमचे मन शुद्ध राहील आणि या पवित्र नद्यांच्या आशीर्वाद तुमच्यावर असेल.
‘गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरि जल स्मिन्सन्निधिं कुरु।।’
आपल्या आराध्य दैवताचा अशी पूजा करा
आंघोळ केल्यावर आपल्याला पवित्र मनाने आराध्य देवाची पूजा करावी. कोणत्याही देवतेच्या पूजेसाठी त्यांच्याशी संबंधित आसनावर पूजा केल्यास लवकरच फळ मिळते. पूजा, दान, होम-हवन, तर्पण इत्यादी कोणत्याही विधी करण्यापूर्वी आपण भगवान प्रसाद मानला जाणारा टिळा लावावा. पूजेची कामे विना टिळा निष्फळ ठरतात.
Tilak Remedies | टिळा लावल्याने सौंदर्यच नाही तर सौभाग्यही वाढते, जाणून घ्या टिळा लावण्याचे नियम आणि फायदेhttps://t.co/neWgulpFFe#Tilak #Spiritual #TilakRemedies
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2021
Chanting Mantras Start Your Day By Chanting These Mantras Everyday For Good Luck
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :