उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठ महापर्व उद्या होणार पूर्ण

छठ महापर्वाची यंदा सुरुवात पाच नोव्हेंबरला स्नान करून झाली. तर सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन थेट महापर्व समाप्त होईल

उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठ महापर्व उद्या होणार पूर्ण
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 6:34 PM

हिंदू धर्मात छठ महापर्वाला खूप महत्त्व आहे. छठ महापर्वाची यंदा सुरुवात पाच नोव्हेंबरला स्नान करून झालीये. तर सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल. त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन थेट महापर्व समाप्त होईल आणि त्यानंतर महिला उपवास पूर्ण करतील. छटपूजेच्या चौथ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि त्यासोबतच छठ उत्सवाची समाप्ती होते.

छटपूजा मुख्यतः सूर्य देव आणि छठ मैया यांच्या उपासनेचा सण आहे. या काळात 36 तासांचा निर्जली उपास केला जातो. ज्या दरम्यान फक्त मावळत्या आणि उगवत्या सूर्याची पूजा करतात. अशी मान्यता आहे की सूर्य देवाच्या आशीर्वादाने माणसाला निरोगी आयुष्य प्राप्त होते. आणि छठी मैयाच्या आशीर्वादाने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्त होते. मुलांच्या सुखी आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने अनेक इच्छित मनोकामना पूर्ण होतात.

उपवास सोडण्याची योग्य वेळ

तिथीनुसार गुरुवार सात नोव्हेंबर रोजी छटपूजेचा सण साजरा केला जाणार आहे. छटपूजा पूर्ण करण्यासाठी सात नोव्हेंबरला सायंकाळी सूर्याला अर्घ्य दिले जाईल आणि आठ नोव्हेंबरला सकाळी अर्घ्य दिले जाईल. आठ नोव्हेंबरला सूर्योदय सकाळी सहा वाजून 38 मिनिटांनी होईल. सूर्योदय झाल्यानंतर उपवास सोडता येईल.

उपास सोडण्याचे योग्य नियम

  • उपवास सोडण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्योदयाची वेळ. उपवास सोडण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले जातात.
  • पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करून तिथे दिवा लावावा. त्यानंतर प्रसाद तयार केला जातो.
  • प्रसादामध्ये साधारणपणे फळ, दूध, दही, थेकुवा या गोष्टींचा समावेश असतो.
  • सूर्यदेव आणि छठी मैयाची पूजा करून उगवत्या सूर्याला अर्घ्य दिला जातो. नंतर प्रसाद सगळ्यांना वाटून मग स्वतः घ्यायचा असतो.
  • पूजेनंतर गरिबांना दान करा.
  • उपवास सोडताना सात्विक जेवणच घ्यावे.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.