Chhath Puja : छठ पूजा ‘या’ 5 गोष्टींशिवाय अपूर्ण, जाणून घ्या
Chhath Puja 2024: दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला छठ पूजेचा सण सुरू होतो आणि सप्तमी तिथीला उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन या सणाची सांगता होते. हा सण सूर्यदेव आणि छठी मैयाला समर्पित आहे. छठ पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. छठ सणाची सुरुवात स्नानाने होते. या दिवशी लौकी, हरभरा, डाळ आणि भात खाणे अत्यंत शुभ मानले जाते.
यंदा छठ सण 5 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. छठ सणाचा पहिला दिवस म्हणजे स्नान. या दिवशी घरातील वातावरण शुद्ध राहावे, यासाठी घराची चांगली साफसफाई केली जाते. या दिवशी छठ पूजेचे व्रत करणाऱ्या स्त्रिया साधे आणि सात्त्विक अन्नच घेतात. छठ पूजेचेही काही खास नियम आहेत. हे पाळणे आवश्यक आहे. याविषयी आम्ही खाली माहिती दिली आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये छठ पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, नाहाय-खायपासून सुरू होणारे 36 तासांचे व्रत आणि त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून 8 नोव्हेंबरला पारणाने समारोप होईल. छठ महापर्वातील प्रत्येक दिवसाचे स्वत:चे महत्त्व आहे आणि त्याच्याशी अनेक खास गोष्टी देखील निगडित आहेत.
पहिल्या दिवशी काय करावे?
छठ सणाची सुरुवात स्नानाने होते. या दिवशी लौकी, हरभरा, डाळ आणि भात खाणे अत्यंत शुभ मानले जाते. जे लोक छठचे निर्जल व्रत करतात, त्यांना स्नानाच्या दिवशी जेवणात वरील गोष्टी खाव्या लागतात. त्याशिवाय स्नानाची पूजा पूर्ण मानली जात नाही.
प्रसादात ‘या’ गोष्टी गरजेच्या
छठपूजेच्या प्रसादात कितीही वस्तू ठेवल्या तरी थेकुआ आणि केळीशिवाय छठचा प्रसाद पूर्ण होत नाही. छठ पूजेच्या प्रसादात थेकुआचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. खरणाच्या दिवशी ते तयार केले जाते आणि नंतर प्रसादात अर्पण केले जाते. छठ पूजेमध्ये थेकुआसोबत केळी ठेवणेही खूप गरजेचे आहे. या दोघांशिवाय छठ प्रसाद अपूर्ण आहे.
सूपाला अनन्यसाधारण महत्त्व
छठ पूजेमध्ये सूप असणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवायही छठची पूजा अपूर्ण आहे. कारण, छठ पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नियमासह सूर्यदेवाला अर्घ्य देणे.
छठ पूजेमध्ये जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते, तेव्हा अर्घ्यच्या वेळी वापरले जाणारे सर्व पूजेचे साहित्य सूपामध्येच ठेवले जाते. त्यामुळे सूपशिवाय छठ पूजा पूर्ण होत नाही.
नारळ आणि ऊस
छठ पूजेमध्ये सूर्यदेवाला अर्घ्य देताना नारळ आणि ऊस असणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते तेव्हा सूपमध्ये नारळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळशिवाय सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची पद्धत पूर्ण होत नाही, याशिवाय उसाला ही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पिवळा सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण
छठ पूजेमध्ये पिवळ्या सिंदूलाही विशेष महत्त्व आहे. पिवळ्या सिंदूराचा वापर बहुतेक पूजा किंवा शुभ कार्यात केला जातो. छठपूजेतही उपवास करणाऱ्या महिला पिवळे सिंदूर किंवा भाखरा सिंदूर लावतात. शुभ-भाग्याचे प्रतीक असलेल्या पिवळ्या सिंदूरशिवाय छठची पूजा अपूर्ण मानली जाते.