महादेवाचे असे मंदिर ज्यावर डाकूंची होती अतुट श्रद्धा, श्रावण महिन्यात घालत नसत दरोडा
डाकू ठोकिया श्रावण महिन्यात सोमनाथ मंदिरात भिक्षूचा वेश धारण करून महादेवाची पूजा केली होती. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात ठोकिया आणि त्याच्या टोळीने मारामारी करून लोकांना लुटत नसत, कारण..
चित्रकुट : बुंदेलखंडच्या चित्रकूटमध्ये नेहमीच दरोडेखोरांची दहशत असते. या भूमीवर अनेक नावाजलेले व मोठे दरोडेखोर झाले आहेत. सर्व डाकू हे भगवान भोलेनाथांचे मोठे भक्त असायचे. चित्रकूटमध्ये महादेवाचे मंदिर (Chitrakoot Temple) असून ते सोमनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात डाकू श्रावण (Shravan 2023) महिन्यात भगवान शंकराचा आशीर्वाद घेत असत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सोमनाथ मंदिरात भाविकांची गर्दी असते. 2007 मध्ये पोलिसांना चकमा देत डाकू ठोकियाने स्वतः येथे भगवान भोलेनाथांची रुद्राभिषेक व पूजा केली होती. तेव्हापासून हे ठिकाण अधिक प्रसिद्ध झाले आहे, कारण ज्या ठिकाणी कधीच डाकू पूजा करत नसत तिथे ठोकिया डाकूने स्वतः पूजा केली होती.
डाकू ठोकिया श्रावण महिन्यात सोमनाथ मंदिरात भिक्षूचा वेश धारण करून महादेवाची पूजा केली होती. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात ठोकिया आणि त्याच्या टोळीने मारामारी करून लोकांना लुटत नसत, कारण श्रावण महिना हा भोले शंकराचा असायचा त्यामुळे दरोडेखोर कोणताही गुन्हा करत नसत.
डाकूंनी भोले शंकराची पूजा का केली?
चित्रकूटच्या बारगढ येथील रहिवासी सांगतात की, सोमनाथच्या जंगलात लपण्यासाठी जागा नसल्यामुळे डाकू भोलेनाथची पूजा करत असत. त्यामुळे या मंदिरात पहाटेपासूनच दरोडेखोर पुजेला यायचे. पोलिसांकडे माहिती असूनही काहीही हाती लागले नाही. दरोडेखोर तुरी देऊन पळून जायचे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व डाकू हे भगवान शंकराचे असिम भक्त होते. खडबडीत टेकड्यांमध्ये लपून ते स्वतःला सुरक्षित समजायचे.
चित्रकुटला भगवान रामाचाही इतिहास
चित्रकूट हे हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे पुरुषोत्तम श्रीरामांनी देवी सीता आणि लक्ष्मणासोबत साडे अकरा वर्षांचा वनवास घालवला होता. वास्तविक, चित्रकूट- चित्र + कूट शब्दांच्या संयोगाने बनलेले आहे. संस्कृतमध्ये चित्रा म्हणजे अशोक आणि कूट म्हणजे शिखर . या संदर्भात एक म्हण आहे की या वनक्षेत्रात एकेकाळी अशोकाची झाडे मुबलक प्रमाणात आढळून आल्याने याला चित्रकूट असे नाव पडले.
संत तुलसीदास, वेद व्यास, आदिकवी कालिदास इत्यादींनी आपल्या ग्रंथात चित्रकूट म्हणजेच भगवान श्रीरामाचे स्थान वर्णन केले आहे. मंदाकिनी नदीच्या काठी वसलेले हे चित्रकूट धाम प्राचीन काळापासून आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक सांस्कृतिक स्थान आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)