Christmas : इस्लाममध्ये येशूंचा इतका आदर का आहे? कुराणातही अनेक वेळा उल्लेख, जाणून घ्या सविस्तर!
ख्रिश्चन समाजातील लोक 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. जगभरातील ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी हा सर्वात मोठा आणि अतिशय खास दिवस असतो. मात्र, आपल्याला माहीती आहे का? इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये येशू आणि मेरीचा उल्लेख अनेकदा करण्यात आलेला आहे.
मुंबई : ख्रिश्चन समाजातील (Christian society) लोक 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. जगभरातील ख्रिश्चन धर्माच्या लोकांसाठी हा सर्वात मोठा आणि अतिशय खास दिवस असतो. मात्र, आपल्याला माहीती आहे का? इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये येशू आणि मेरीचा उल्लेख अनेकदा करण्यात आलेला आहे.
-कुराणमध्ये उल्लेख
इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये येशू, मेरी आणि गॅब्रिएल यांचा उल्लेख करण्यात आला आहे. बायबलमधील आदम, नूह, अब्राहम, मोसेस यांचाही कुराणात उल्लेख आहे. कुराणमध्ये अब्राहमला इब्राहिम आणि मोसेसला मूसा म्हटले गेले आहे. येशू यांचे अरबी नाव ईसा आहे. कुराणात हजरत इसा लैहिस्सलाम यांचा उल्लेख आहे, ज्यांना ख्रिश्चन समुदाय येशू ख्रिस्त असे म्हणतात आणि इस्लामचे लोक हजरत ईसा या नावाने ओळखतात.
मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, हजरत ईसा (येशू) हे अल्लाहचे पैगंबर होते आणि त्यांना कुमारी मरियम यांनी जन्म दिला. जेव्हा कुमारी मरियम गॅब्रिएल (येशू) च्या जन्माबद्दल सांगते तेव्हा मरियम म्हणते, मला एकाही पुरुषाने हात लावला नसताना मी मुलाला जन्म कसा देणार?’ तेव्हा गॅब्रिएल (देवदूत) म्हणतो की, देवाला सर्व काही शक्य आहे. तो दया आणि करुणेचा संदेश देण्यासाठी पृथ्वीवर येईल.
-एक संपूर्ण अध्याय
मेरीला अरबी भाषेत मरियम म्हणतात. विशेष म्हणजे कुराणात त्यांच्यावर एक संपूर्ण अध्याय आहे. म्हणजे जर कुराणमध्ये स्त्रीबद्दल संपूर्ण अध्याय असेल तर तो फक्त मेरीवरच आहे. कुराणातही मेरी ही एकमेव स्त्री आहे जिच्या नावाचा उल्लेख आहे. इतर स्त्रियांची व्याख्या कुराणमध्ये त्यांच्या नातेसंबंधाने किंवा काही शीर्षकाने केली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र, न्यू टेस्टामेंट ऑफ द बाइबल पेक्षा मेरीचा उल्लेख कुराणात जास्त आहे.
इस्लाममधील इतर पैगंबरांप्रमाणे येशू हे देखील लोकांसाठी संदेश घेऊन येतो. येशू यांच्या संदेशाला इंजील असे म्हणतात. कुराणानुसार, इंजील हा अल्लाहने मानवतेला दिलेल्या चार पवित्र ग्रंथांपैकी एक आहे. ज्यामध्ये इतर 3 जबूर, तौरात आणि कुराण आहेत. ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, येशू यांनी अनेक चमत्कार केले आणि ते सर्वांचे दुःख दूर करत असे. ख्रिस्ती धर्मात येशूंच्या दृष्टी आणि मृतांना जिवंत करणे यासारख्या चमत्कारांचा उल्लेख आहे.
संबंधित बातम्या :
Chanakya Niti : शिक्षणाशी संबंधित आचार्यांच्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात.