संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, आयुष्याची नवी दिशा देणारे ‘दासबोध’ , आज समर्थ रामदासांच्या दासबोधाची जयंती
समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास (Samarth Ramdas) स्वामी यांनी दासबोध (Dasbodh)ग्रंथाची निर्मिती केली.
मुंबई : समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास (Samarth Ramdas) स्वामी यांनी दासबोध (Dasbodh)ग्रंथाची निर्मिती केली. रामाची (Ram) आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली. त्यामुळे या दिवशी दासबोध जयंती साजरी केली जाते. १७ व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केले आहे. लग्नाच्या बोहल्यावर सावधान झालेल्या रामदासांनी संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी दिला आहे.
दासबोधाचा जन्म १७ व्या शतकात रामदासांनी दासबोध रचला. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली.रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते.
दासबोधाची रचना दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते.
दासबोधाची वैशिष्ट्ये गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेश वंदन, सरस्वती वंदन, गुरू वंदन दासबोधात आढळत नाही. हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात.
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल
Zodiac signs : ‘या’ 4 राशीच्या लोकांच्या सहवासात राहा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा!