Dasha Mata Puja 2022 | सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी दशामातेची आराधना करा, जाणून घ्या व्रताचे महत्त्व
हिंदू (Hindu) धर्मात प्रत्येक सण उत्साहात साजरा केला जातो. चैत्र (Chaitra) महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमीला रविवारी दशामातेची पूजा केली जाईल. या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीच्या कामनाने पिंपळाच्या झाडाची पूजा करतात.
मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात प्रत्येक सण उत्साहात साजरा केला जातो. चैत्र (Chaitra) महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमीला रविवारी दशामातेची पूजा केली जाईल. या दिवशी स्त्रिया घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीच्या कामनाने पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. धार्मिक श्रद्धेनुसार रविवारी पिंपळाच्या (Pimpal) झाडाची पूजा करणे निषिद्ध मानले जाते. पण या दिवशीमात्र ही या झाडाची पुजा केली जाते. तिथीच्या तत्त्वानुसार सण-उत्सवांसाठी तिथीला विशेष मान्यता दिली जाते, काही विद्वानांचे म्हणणे आहे रविवारी दशमी तिथील दिवसभर दशामातेची पूजा केल्यास शुभफल प्राप्त होईल. आयुष्यातील सर्व दु:ख नाहीशी होतात.
कधी केली जाते पुजा भगवान विष्णूची कोणत्याही रूपात उपासना केल्याने नेहमीच यश मिळते. घराची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी, सुख-समृद्धी मिळवण्यासाठी आणि अन्न-संपत्तीचा साठा ठेवण्यासाठी दशामातेच्या दिवशी भगवान विष्णूची पिंपळाच्या रूपात पूजा करण्याचा नियम सांगितला आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी दशमातेची उपासना केली जाते. हे व्रत तुमच्या अशुभ ग्रहांची स्थिती सुधारते आणि सुख, समृद्धी, सौभाग्य आणि संपत्ती आणते. या व्रताला दशमाता व्रत म्हणतात. दशमाता पूजन यावर्षी रविवार 27 मार्च 2022 रोजी होणार आहे. हे व्रत उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पाळले जाते. गुजरात, महाराष्ट्र इत्यादी भारतातील पश्चिमेकडील राज्यांतील अनेक भागांत असे करण्याची परंपरा आहे. या वेळी दशमातेच्या दिवशी सकाळी 6.28 ते दुपारी 1 या वेळेत सर्वार्थसिद्धी योगही तयार होत आहे.
हे व्रत करताना या गोष्टी लक्षात घ्या
- हे व्रत मधे सोडू शकत नाही. असे करणे अशुभ मानले जाते. आवश्यक असल्यास तुम्ही व्रत मोडू शकता.
- पिंपळाच्या झाडाच्या सावलीत दशामातेची पूजा करणे शुभ मानले जाते. आणि पूजेचा धागाही पिंपळाभोवती बांधला जातो. या दिवशी पीपळाची पूजा करून भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.
- या व्रतामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. घरातील अनावश्यक वस्तूही बाहेर ठेवल्या जातात. यासोबतच या दिवशी साफसफाईशी संबंधित वस्तू म्हणजे झाडू इत्यादी खरेदी करण्याची परंपराही प्रचलित आहे.
- दशमाता व्रत नियमानुसार, प्रामाणिक मनाने आणि भक्तीने केल्यास वर्षभरातच जीवनातील दु:ख आणि समस्या दूर होतात, असा समज आहे.
- दशामातेची दोरी वर्षभर गळ्यात घातली जाते. परंतु दशामातेची तार वर्षभर घालता येत नसेल तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही शुभ दिवशी ती उघडी ठेवता येते. त्या दिवशी उपवास करावा.
संबंधीत बातम्या
Zodiac | ‘हाच तो दिवस’, आजपासून या 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व चिंता मिटणार
Chanakya Niti | माणसांची ओळख करण्यात चुकताय ? मग या 4 गोष्टी तपासून पाहा, आयुष्यात फसवणूक होणार नाही
26 March 2022 Panchang : 26 मार्च 2022, शनिवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ