Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Day wise work | शुभफळ मिळण्यासाठी योग्य दिवशी काम करा, बिघडलेली कामंसुद्धा चुटकीसरशी होणार

हिंदू धर्मात शुभ दिवस, पंचाग, शुभ तिथी, या गोष्टींना खुप महत्त्व आहे. आयुष्यातील प्रत्येक शुभ कार्याच्यावेळी मुहूर्त पाहिला जातो. असे म्हणतात की तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश हवे असेल किंवा ते काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करायचे असेल तर योग्य दिवशी ते काम केल्यास ते काम लवकर होते.

Day wise work | शुभफळ मिळण्यासाठी योग्य दिवशी काम करा, बिघडलेली कामंसुद्धा चुटकीसरशी होणार
day-work
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 8:37 AM

मुंबई : हिंदू धर्मात शुभ दिवस, पंचाग, शुभ तिथी, या गोष्टींना खुप महत्त्व आहे. आयुष्यातील प्रत्येक शुभ कार्याच्यावेळी मुहूर्त पाहिला जातो. असे म्हणतात की तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश हवे असेल किंवा ते काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करायचे असेल तर योग्य दिवशी ते काम केल्यास ते काम लवकर होते. हिंदू धर्मात प्रत्येक दिवसासाठी एक ग्रह आहे आणि त्या ग्रहाचे शुभफळ देणार्‍या देवतेची पूजा निश्चित आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसासाठी कार्ये निश्चित केली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिवशी तुम्ही कोणते काम कराल.

रविवार

रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. जर तुम्ही सत्तेशी संबंधित असाल तर हा दिवस सर्वसामान्यांना भेटण्यासाठी खूप शुभ आहे. शुभकार्यासाठी या दिवशी कपाळावर लाल चंदन लावावे. या दिवशी पूर्व, उत्तर आणि अग्निकोण दिशेला प्रवास करणे शुभ असते. रविवारी, तुम्ही इलेक्ट्रिकल वस्तू, सोने, तांबे खरेदी आणि वापरू शकता.

सोमवार

सोमवारी दक्षिण, पश्चिम आणि पश्चिम दिशेने प्रवास करणे शुभ आहे, तर पूर्व दिशेला प्रवास करू नये. घर बांधण्यासाठी सोमवारचा दिवस चांगला आहे. हा दिवस कार्यालय घेण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी खूप शुभ आहे. सोमवार हा सामान खरेदीसाठी शुभ मानला जातो.

मंगळवार

जर तुम्ही व्यायाम कारायच असं ठरवत असाल पण तसे होत नसेल तर मंगळवार हा तुमच्यासाठी योग्य दिवस आहे. हेरगिरी संबंधित काम करण्यासाठी, शस्त्रास्त्रांचा सराव, चाचणी सुरू करण्यासाठी शुभ आहे. हा दिवस विजेच्या वस्तू खरेदीसाठीही शुभ आहे.

बुधवार

बुधवार हा दिवस अभ्यासाशी संबंधित कामासाठी, पैसे जमा करण्यासाठी, मुलीच्या लग्नाचा निर्णय घेण्यासाठी शुभ मानला जातो. बुधवार हा एखाद्या व्यक्तीशी समझोता करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो. शेअर संबंधित कामांसाठीही हा दिवस शुभ आहे.

गुरुवार

गुरुवार हा दिवस देवाची आराधना करण्यासाठी, अभ्यास आणि शिकवण्यासाठी, शेती करण्यासाठी शुभ आहे. गुरुवारी कामात यश मिळविण्यासाठी हळद किंवा केशराचा तिलक लावा. कोणतेही वाईट व्यसन सोडण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे.

शुक्रवार

सुविधांशी संबंधित वस्तू, मेकअपशी संबंधित वस्तू, परफ्यूम, कपडे, वाहन इत्यादी खरेदी आणि वापरासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. कोणतीही कला शिकण्यासाठी शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो.

शनिवार

नवीन घरात प्रवेश करणे, शहरात स्थायिक होणे, इमारतींचे बांधकाम, तांत्रिक कामे इत्यादीसाठी शनिवार शुभ आहे. शनिवार हा दिवस एखाद्या गोष्टीची स्थापना करण्यासाठी शुभ मानला जातो. मात्र, शनिवारी प्लास्टिक, तेल, पेट्रोल, लाकूड, सिमेंट आदी वस्तू खरेदी करू नयेत. तसेच शनिवारी पूर्व दिशेला प्रवास करू नये.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.

यशाच्या शोधात आहात? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी आत्मसात करा

Vastu Tips | हातात पैसा टिकत नाहीय? वास्तुशास्त्रानुसार ही 5 झाडे घरात लावा पैसाच पैसा येईल

Shaadi Muhurat 2021 : लग्न, गृहप्रवेश, घर-गाडी खरेदीची योजना आखताय? जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरचे शुभ मुहुर्त

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.