पुढचे काही दिवस अयोध्येत येऊ नका… भाविकांना आवाहन; कारण काय?
महा कुंभात अमृत स्नान करण्यासाठी करोडो लोक प्रयागराजला पोहोचले आहेत. माऊली अमावस्येला तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली होती. पण प्रयागराज प्रमाणेच अयोध्या आणि बनारसला ही लाखो भावी पोहोचत आहे. तेथे शरयू आणि गंगा नदीत श्रद्धेने स्नान करत आहे.
![पुढचे काही दिवस अयोध्येत येऊ नका... भाविकांना आवाहन; कारण काय? पुढचे काही दिवस अयोध्येत येऊ नका... भाविकांना आवाहन; कारण काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Ayodhya.jpg?w=1280)
महाकुंभात मौनी अमावस्येमुळे प्रयागराज मध्ये भाविकांची मोठी गर्दी होत झाली होती. मात्र त्याचा परिणाम केवळ प्रयागराज मध्येच झाला नाही तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांवरही दिसून येत आहे. लोकांना सध्या या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. अयोध्या काशी आणि इतर अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली आहे. लोक अयोध्येच्या शरयू नदीवर आणि बनारसच्या घाटावर श्रद्धेने स्नान करण्यासाठी येत आहेत.
प्रयागराज पासून अयोध्या 168 किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे संगमांमध्ये शाही स्नान करून अनेक भाविक रामनगरी अयोध्येला पोहोचत आहेत. येथे शरयू नदी आहे. असे देखील काही भाविका आहे ज्यांना मौनी अमावस्येला प्रयागराजला जाता येत नाही. ते भाविक येथील शरयू नदीत श्रद्धेने स्थान करत आहे. पहाटे तीन वाजल्यापासून लाखो भाविकांचे येथे आगमन झाले होते.
अशीच काही अवस्था काशी बनारसची झाली आहे प्रयागराज पासून वाराणसी फक्त 136 किलोमीटर अंतरावर आहे. दूर दूर वरून महा कुंभासाठी आलेले भाविक बनारस आणि अयोध्येलाही पोहोचले आहेत. बनारस येथील रहिवासी आणि आजूबाजूचे लोक नेहमी अमावस्येला इथल्या घाटात स्नान करतात. अमावस्येची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी पित्रांचाही पृथ्वीवर वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे पित्रांसाठी या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्व आहे. कदाचित त्यामुळेच मौनी अमावस्येच्या दिवशी लाखो भाविक गंगा सारख्या पवित्र नदीवर पोचतात आणि स्नान करतात.
काय म्हणाले राम मंदिर ट्रस्ट?
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी आजूबाजूच्या भाविकांना पंधरा दिवसांनीच अयोध्या मध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. चंपत राय म्हणाले की महा कुंभ आणि मौनी अमावस्येमुळे प्रयागराज येथूनही मोठ्या संख्येने भाविक येत आहे. प्रयागराजहून रेल्वे आणि रस्त्याने भाविक अयोध्येत येत आहेत. गेल्या चार दिवसात आयोध्येला भेट देणाऱ्यांच्या संख्येत अभूतपूर्वक वाढ झाली आहे.
महासचिव चंपत राय पुढे म्हणाले की आयोध्या धाम ची लोकसंख्या आणि आकार पाहता मोठ्या संख्येने भाविकांना एका दिवसात राम लल्लाचे दर्शन घेणे खूप अवघड आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भाविकांना जास्त पायी जावे लागत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भाविकांनी 15 ते 20 दिवसांनी अयोध्येत दर्शनासाठी यावे अशी विनंती करण्यात आली आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या येणाऱ्या भाविकांना रामलल्लाचे सहज दर्शन घेता येईल. यामुळे सर्वांची योग्य सोय होईल. वसंत पंचमी नंतर फेब्रुवारी महिन्यात मोठा दिलासा मिळेल. अशी विनंती त्यांनी केली आहे.