Dhanteras 2021 : धनत्रयोदशीच्या शुभ दिनी या मंत्रोच्चाराने मिळेल निरोगी आयुष्य, जाणून घ्या भगवान धन्वंतरीच्या पूजेची पद्धत

दरवर्षी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे. भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अंश मानले जातात.

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीच्या शुभ दिनी या मंत्रोच्चाराने मिळेल निरोगी आयुष्य, जाणून घ्या भगवान धन्वंतरीच्या पूजेची पद्धत
Bhagwan Dhanvantari
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 11:26 AM

मुंबई : दरवर्षी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे. भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अंश मानले जातात. त्रयोदशीच्या दिवशी त्यांचा जन्म झाल्यामुळे या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात.

हिंदू धर्मात असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने व्यक्ती निरोगी आयुष्य जगतो. त्यामुळे या दिवशी जयंतीनिमित्ताने भगवान धन्वंतरीची पूजा केलीच पाहिजे. तसेच त्यांच्या मंत्रांचा जपही करावा. यावेळी धनत्रयोदशी मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी आहे. भगवान धन्वंतरीच्या कुठल्या मंत्राचा जप केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांची आरती जाणून घ्या.

या मंत्रांचा जप करा

1. ॐ श्री धनवंतरै नम:

2. ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:, अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय, त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप, श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः

3. ॐ रं रुद्र रोग नाशाय धन्वंतर्ये फट

4. ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः, सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम, कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम, वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम.

ही आरती आहे

जय धन्वंतरि देवा, जय धन्वंतरि जी देवा, जरा-रोग से पीड़ित, जन-जन सुख देवा.तुम समुद्र से निकले, अमृत कलश लिए, देवासुर के संकट आकर दूर किए.आयुर्वेद बनाया, जग में फैलाया, सदा स्वस्थ रहने का, साधन बतलाया.भुजा चार अति सुंदर, शंख सुधा धारी, आयुर्वेद वनस्पति से शोभा भारी.तुम को जो नित ध्यावे, रोग नहीं आवे, असाध्य रोग भी उसका, निश्चय मिट जावे. हाथ जोड़कर प्रभुजी, दास खड़ा तेरा, वैद्य-समाज तुम्हारे चरणों का घेरा.

धन्वंतरिजी की आरती जो कोई नर गावे, रोग-शोक न आए, सुख-समृद्धि पावे.

ही पूजेची पद्धत आहे

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान धन्वंतरीचे चित्र स्थापित करा. यावेळी हे लक्षात असू द्या की पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्वेकडे असेल. यानंतर त्यांना कुंकू, अक्षता, फुले, धूप, दिवा, दक्षिणा, वस्त्रे, कलावा अर्पण करा. मिठाई अर्पण करा आणि नंतर भगवान धन्वंतरीच्या मंत्रांचा जप करा. त्यानंतर आरती करा आणि तुमचं कुटुंब नेहमी निरोगी राहावं यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करा. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते.

दीपदानाचा शुभ मुहूर्त कोणता

भगवान धन्वंतरीची पूजा केल्यानंतर दीपदान करावे. भगवान धन्वंतरी कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारतात आणि हा सायंकाळचा दिवा कुटुंबातील सदस्यांना अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी लावला जातो. हा दिवा यमराजाला समर्पित असतो.

धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान आणि पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 6.30 मिनिटांचा असेल. याशिवाय संध्याकाळी 6:30 ते रात्री 8:11 ही वेळ देखील पूजा आणि दिवा लावण्यासाठी शुभ मानली जात आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diwali 2021 : घराच्या मुख्य दारावर या तीन गोष्टी लावा, घरात लक्ष्मी नांदेल

Dhanteras 2021: धनत्रयोदशीला का घेतात झाडू विकत ? जाणून घ्या याचे विशेष महत्व

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.