Diwali 2022: धनत्रयोदशीला करा धन्याचे ‘हे’ उपाय, घरातली आर्थिक चणचण जाईल निघून
धनत्रयोदशी हा दिवाळीतील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान धन्वन्तरी यांची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या काही उपायांनी आर्थिक चणचण दूर होते.
मुंबई, धनत्रयोदशीच्या (Ddhanteras 2022) दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा (Lakshmi Puja 2022) केली जाते आणि या दिवशी खरेदी आणि दान करणे देखील शुभ मानले जाते. हा दिवस धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती म्हणूनही ओळखला जातो. यावेळी 23 ऑक्टोबर, रविवारी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी आयुर्वेदिक औषधाचे जनक धन्वंतरी देव समुद्रमंथनातून प्रकट झाले आणि प्रकट होण्याच्या वेळी त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. त्यामुळेच या दिवशी भांडी खरेदी केली जातात. असे म्हटले जाते की या दिवशी भांडी खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि घरात सुख-समृद्धीसाठी उपाय केले तर ते खूप प्रभावी मानले जाते. चला जाणून घेऊया धन्यासंबंधित उपाय
धनत्रयोदशीला धन्याचे उपाय
धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करा आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून गूळ आणि धन्याचा नैवैद्य दाखवा. यापैकी काही दाणे घरातील बागांमध्ये पेरा. मान्यतेनुसार या दिवशी बियांपासून उगवलेली कोथिंबीर घरात सुख-समृद्धी आणते.
वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याचा उपाय केल्याने अनेक फायदे होतात. या दिवशी धने खरेदी करून घरी आणावे. देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना धने अर्पण करून तुमची इच्छा सांगा आणि नंतर घरातील एखाद्या ठिकाणी धने मातीत गाडून टाका. यानंतर काही धने लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो.
धनत्रयोदशी 2022 शुभ मुहूर्त
- कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी सुरू होते – 22 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.02 वा.
- कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तारीख संपेल – 23 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.03 पर्यंत
- धन्वंतरी देव पूजनाची शुभ वेळ – 23 ऑक्टोबर 2022 ते रविवार, संख्याकाळी 5.44 – संख्याकाळी 06.05
- शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी – 21 मिनिटे
- प्रदोष काळ : संध्याकाळी 5.44 ते रात्री 8.16
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)