Diwali 2022: हा आहे लक्ष्मी पूजनाचा योग्य विधी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा साहित्य

दीपावली 24 ऑक्टोबरला आहे, तर दुसऱ्या दिवशी होणारी गोवर्धन पूजा 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्यामुळे 26 ऑक्टोबरला होणार आहे.

Diwali 2022:  हा आहे लक्ष्मी पूजनाचा योग्य विधी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा साहित्य
दिवाळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 11:43 PM

मुंबई,  दिवाळीमध्ये (Diwali 2022) लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. पाच दिवसांच्या या सणात पाच महत्त्वाचे दिवस साजरे होतात, जे आपण पंचपर्व म्हणून साजरे करतो. हिंदू धर्मात या पाच सणांना खूप महत्त्व आहे. दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येतो. प्रकाशाच्या या सणाची प्रत्त्येकच जण आतुरतेने वाट पाहत असतो.  धनत्रयोदशी यापैकी प्रथम साजरी केली जाते. यानंतर नरकचतुर्दशी व दीपावली, त्यानंतर गोवर्धन पूजा आणि शेवटी भाऊबीज. दिवाळीच्या रात्री शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी  पूजेचे विशेष साहित्य लागतात. ज्याची व्यवस्था वेळेआधी करणे आवश्यक आहे. या वर्षीच्या दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता असेल ते जाणून घेऊया.

दिवाळी 2022 लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त

अमावस्या 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05.27 वाजता सुरू होईल

अमावस्या तिथी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04.18 वाजता समाप्त होईल

दीपाली पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत

दीपावली 24 ऑक्टोबरला आहे, तर दुसऱ्या दिवशी होणारी गोवर्धन पूजा 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्यामुळे 26 ऑक्टोबरला होणार आहे. 2007 नंतर दुसऱ्यांदा असे होणार आहे. दिवाळीच्या दिवशी सकाळी चतुर्दशी असेल आणि दुपारी अमावस्या सुरू होईल.

 पूजेचे साहित्य

धूप, अगरबत्ती, कापूर, केसर, चंदन, अक्षत, जानवे 5, कापसाचे वस्त्र, अबीर, गुलाल, बुक्का, सिंदूर, सुपारी, विड्याचे पानं, आंब्याचे पानं,   दुर्वा, अत्तराची बाटली, प्रसादासाठी पेढे, पाच प्रकारची फळं, कमळाचे फुल, दूध, दही, तूप, मध, साखर याचे पंचामृत.  चांदीचे नाणे, नारळ, लक्ष्मी देवीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, लाल वस्त्र, पेन, हिशेबाची वही, तांब्याचा कलश नाणी, लक्ष्मीपूजनाचे चित्र, श्री. यंत्र चित्र हे पूजेचे साहित्य आवश्यक आहे.

पूजेचा विधी

लक्ष्मीपूजन करताना एका चौरंग घ्यावं. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन त्यात जरा गंगा जल मिसळून 80 टक्के पाण्याने भरुन घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे.
कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या.
आता देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी ठेवावी  आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. पूजा स्थळी केससुणीची पूजा करावी.
आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करु शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.