Diwali 2023 : ग्रहदोषामुळे प्रगती थांबली आहे? दिवाळीत अवश्य लावा मातीची पणती

दिव्यांचा आणि रोषणाईचा सण दिवाळा अवघअया काहीच दिवसांवर आलेला आहे. या सणाला मातीचे दिवे ज्याला आपण पणती म्हणतो ते लावण्याचे विशेष महत्त्व आहे. या सणाला मातीचे दिवे लावल्याने ग्रहदोष दूर होतो. जाणून घेऊया मातीचे दिवे लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व.

Diwali 2023 : ग्रहदोषामुळे प्रगती थांबली आहे? दिवाळीत अवश्य लावा मातीची पणती
दिवाळीत पणतीचे महत्त्वImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 8:32 AM

मुंबई : शरद पौर्णिमा झाल्यानंतर दिवाळीची (Diwali 2023) चाहूल लागायला सुरूवात होते. रंगेबीरंगी रांगोळी, वेगवेगळ्या आकाराचे मातीचे दिवे, सजावटीचे सामान, फटाके यांनी बाजारपेठा सजू लागतात. घरातील महिला वर्ग फराच्या तयारीला लागतात. गोडधोड खायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीसुद्धा उत्साहात असते. तसे तर वर्षभर अनेक सण साजरे होतात मात्र हिंदू धर्मात दिवाळी या पाच दिवसीय सणाला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सुरू होते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा विधीनुसार केली जाते. या दिवशी लोकं नवीन कपडे परिधान करतात, इतर देवतांसह भगवान लक्ष्मीची पूजा करतात आणि संपूर्ण घर दिवे आणि रांगोळीने सजवतात. त्यानंतर दिवाळी निमीत्त बनवलेल्या फराळाचे आदान प्रदान होते.

दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी लोकं आपले घर मातीच्या दिव्यांनी म्हणजेच पणत्यांनी पूर्णपणे सजवतात. पण तुम्ही कधी दिवाळीला फक्त मातीचे दिवे का लावले जातात यामागचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जोतिषी नचिकेत काळे यांच्याकडून जाणून घेऊया दिवाळीला फक्त मातीचे दिवे का लावले जातात.

दिवाळी साजरी करण्यामागील कारण

पौराणिक मान्यतेनुसार, 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम अयोध्येत परतले, त्यानिमित्त शहरातील लोकांनी दिवे लावून आणि रांगोळी काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर दिव्यांनी उजळून निघाले होते. तेव्हापासून कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जाऊ लागला. या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच श्रीगणेश आणि देवी सरस्वती यांचीही पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

दिवाळीला मातीचे दिवे का लावले जातात?

मातीचे दिवे लावण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा माती आणि जमीनीचा कारक मानला जातो. मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित आहे. यामुळेच माती आणि मोहरीच्या तेलाचे दिवे लावून मंगळ आणि शनि दोन्ही बलवान होतात. त्यामुळे शुभ फल मिळते. आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीचे मंगळ आणि शनि बलवान असतील तर त्याला धन, संपत्ती, सुख आणि वैवाहिक जीवनात सर्व सुख प्राप्त होते.

तणाव दूर होतो

मातीचे दिवे लावल्याने सकारात्मक उर्जा संचारते जी जीवनात आनंद टिकवून ठेवते. मातीचा दिवा हा पंच तत्वांचा निरूपण मानला जातो. खरे तर सर्व काही मातीच्या दिव्यात सापडते. पणती ही माती आणि पाण्यापासून बनवली जाते. ते प्रज्वलीत करण्यासाठी आग्नी लागते आणि हवेमुळे अग्नी प्रज्वलीत होते. त्यामुळेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर फक्त मातीचे दिवे लावले जातात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.