Diwali 2023 : जगभरात अशा प्रकारे साजरी केली जाते दिवाळी, या सणाशी संबंधीत मान्यता

हिंदू धर्माशी निगडित लोकांसाठी दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, शुभ आणि लाभाची देवता श्री गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते जेणेकरुन त्यांचा आशिर्वाद कुटूंबावर राहो. वर्षभर त्यांचे घर सुख समृद्धीने भरून राहो. यावर्षी हा पवित्र सण 12 नोव्हेंबर 2023 रोजी देश-विदेशात साजरा केला जाणार आहे.

Diwali 2023 : जगभरात अशा प्रकारे साजरी केली जाते दिवाळी, या सणाशी संबंधीत मान्यता
दिवाळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 8:08 AM

मुंबई : दिवाळी (Diwali) म्हंटल की खरेदी, मोती साबणाने आंघोळ, मित्रांसोबत फराळ, फटाके आणि धम्माल मस्ती अशी व्याख्या लहान मुलांसाठी असते. मात्र धार्मिक दृष्या या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्माशी निगडित लोकांसाठी दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, शुभ आणि लाभाची देवता श्री गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते जेणेकरुन त्यांचा आशिर्वाद कुटूंबावर राहो. वर्षभर त्यांचे घर सुख समृद्धीने भरून राहो. यावर्षी हा पवित्र सण 12 नोव्हेंबर 2023 रोजी देश-विदेशात साजरा केला जाणार आहे. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक मानला जाणारा दिवाळी सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि श्रद्धांच्या आधारे साजरा केला जातो. भारत आणि परदेशातील दिवाळीशी संबंधित रंजक गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

दिवाळीच्या दिवशी देव पृथ्वीवर येतात

भारताच्या पूर्वेला वाराणसीची दिवाळी खूप प्रसिद्ध आहे. येथे दिवाळीपेक्षा देव दिवाळीच्या दिवशी अधिक शोभा दिसून येते आणि या दिवशी घाट हजारो दिव्यांनी सजवले जातात. हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी स्वर्गातील देवता दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवर येतात. देव दिवाळी पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात.

dev dipawali Varanasi

वाराणसी येथील देव दिवाळीचे दृश्य

ही परंपरा पंजाबच्या दिवाळीशी संबंधित आहे

उत्तर भारताप्रमाणे पंजाबमध्येही दिवाळीचे वेगळेच आकर्षण आहे. पंजाबमध्ये शीख परंपरेचे लोक हा सण बंदिछोड दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी शिखांचे सहावे गुरू गुरु हरगोविंद सिंग यांची तुरुंगातून सुटका झाली, अशी त्यांची धारणा आहे. या दिवशी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील दिवे आणि फटाके पाहण्यासारखे असतात.

हे सुद्धा वाचा
Amrutsar Diwali

अमृतसर येथील सुवर्ण मंदिर दिवाळीत अशा प्रकारे सजवले जाते

गुजरातमध्ये दिवाळी अशीच चमकते

गुजरातमध्ये दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुजरातमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी लोक 15 दिवस आधीच तयारी सुरू करतात. गुजरातमध्ये दिवाळीच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि या दिवशी स्वच्छतेसह संपूर्ण घराची विशेष सजावट केली जाते. गुजराती लोकांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा आणि मिठाई देतात.

Diwali celebration in Gujrat

गुजरातमध्ये पारंपारीक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते

परदेशातही दिवाळी साजरी केली जाते

देशाप्रमाणेच, ज्या देशात हिंदू धर्माशी संबंधित लोक राहतात, तेथेही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उदाहरणार्थ, नेपाळमध्ये दिवाळीला स्वांती म्हणतात. येथेही हा पवित्र सण पाच दिवस साजरा केला जातो. तर श्रीलंकेत तमिळ लोक हा पवित्र सण पूर्ण विधींनी साजरा करतात. त्याचप्रमाणे अमेरिका, लंडन, थायलंड, मलेशिया आदी देशांतही दिवाळीनिमित्त मोठा उत्सव होतो. येथे राहणारे लोक पूजा करून दिवाळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करतात.

America Diwali celebration

परदेशातही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.